युक्रेनमध्ये अडकलेल्या 200 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने झेपावलं

मुंबई तक

युक्रेनवर रशियाने हल्ला चढवला आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष चांगलाच वाढला आहे. काहीही झालं तरी आपण हटणार नाही असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं आहे. अशात तिथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने झेपावलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

युक्रेनवर रशियाने हल्ला चढवला आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष चांगलाच वाढला आहे. काहीही झालं तरी आपण हटणार नाही असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं आहे. अशात तिथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने झेपावलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे एस. जयशंकर यांनी?

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की युक्रेनमधून सुखरूप घेऊन २१९ विद्यार्थ्यांना घेऊन निघालो आहोत. रोमानियातून मुंबईच्या दिशेने पहिलं फ्लाईट रवाना झालं आहे. आमची पथकं विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. मी व्यक्तीगत पातळीवर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

रशियाकडून कीववर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. शनिवारी राजधानी कीवच्या दक्षिण-पश्चिम भागात रशियाने दोन मिसाईल हल्ले केले. कीवमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू असून, आकाशात रशियन लढाऊ विमानं घिरट्या घालताना दिसत आहे. त्यामुळे युक्रेनच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीती वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारासच गोळीबार सुरू झाल्यानं नागरिकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाण आसरा घेतला आहे.

हे वाचलं का?