Jai Bhim Film: तमिळ अभिनेता सू्र्याला नेटकऱ्यांचा पाठिंबा; #WestandWithSuriya हॅशटॅग होतोय ट्रेंड
जय भीम या चित्रपटातील काही दृश्ये वन्नियार समाजाची बदनामी करणारी असल्याचा आरोप राज्यातील एका जाती समूहाने केल्यानंतर अनेक सेलिब्रिटी, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी तमिळ अभिनेता सूर्याला पाठिंबा देणारे संदेश पोस्ट केले आहेत. सोशल मिडीयावर #WestandWithSuriya हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल झाला आहे. वन्नियार संगमच्या राज्य अध्यक्षांनी सूर्या , ज्योतिका, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांना […]
ADVERTISEMENT
जय भीम या चित्रपटातील काही दृश्ये वन्नियार समाजाची बदनामी करणारी असल्याचा आरोप राज्यातील एका जाती समूहाने केल्यानंतर अनेक सेलिब्रिटी, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी तमिळ अभिनेता सूर्याला पाठिंबा देणारे संदेश पोस्ट केले आहेत. सोशल मिडीयावर #WestandWithSuriya हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल झाला आहे. वन्नियार संगमच्या राज्य अध्यक्षांनी सूर्या , ज्योतिका, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आणि सिनेमातील काही दृश्ये काढून टाकण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
‘वेन्नीयार संगम’नुसार जय भीम चित्रपटात दाखवलेल्या काही दृष्यांमुळे वेन्नीयार समुदायाची बदनामी झाली आहे. प्रतिमाहनन करणारी ही दृष्यं चित्रपटात मुद्दाम टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच वेन्नीयार समुदायाविषयीचे दृष्य चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आलीय. त्यांच्यानुसार चित्रपटात दाखवलेला ‘अग्नी कुंदम’ हे प्रतिक वेन्नीयार समुहाची ओळख आहे.चित्रपटात कोठडीत निर्दोष व्यक्तीचा छळ करून त्याची हत्या करणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव ‘गुरुमुर्ती’ असं ठेवण्यात आलंय. तसेच त्याचा उल्लेख गुरू असा करण्यात आलाय. गुरू हे वेन्नीयार समुदायातील एका मोठ्या नेत्याचं नाव आहे. याशिवाय पीडिताच्या मृत्यूची तारीख सिद्ध करताना या आरोपी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात दाखवलेल्या कॅलेंडरवर वेन्नीयार समुदायाचं प्रतिक दाखवण्यात आलंय,” असा दावा नोटीसकर्त्यांनी केलाय.
हे वाचलं का?
पट्टाली मक्कल कच्ची पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 14 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूमधील मायिलादुथुराई जिल्ह्यातील एका थिएटरला 14 नोव्हेंबर रोजी सूर्याचा चित्रपट प्रदर्शित करण्यास थांबवण्यास भाग पाडले होते.
वन्नियार कोण आहेत?
ADVERTISEMENT
– वन्नियार हे तामिळनाडूमधील सर्वात मोठ्या मागासलेल्या समुदायांपैकी एक आहेत.
ADVERTISEMENT
– राज्यात 20% आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी 1980 च्या मध्यात प्रचंड निदर्शने केली होती.
– वन्नियार संगमचे एस रामदास यांनी पीएमके या राजकीय पक्षाची स्थापना केली
– 1989 मध्ये DMK ने OBC कोटा मागास जाती आणि सर्वात मागास जातींमध्ये विभागला.
– 20% आरक्षणासह वन्नियारांना MBC मध्ये टाकण्यात आले
– AIADMK ने एक विधेयक मंजूर केले, ज्याची अंमलबजावणी सध्याच्या DMK ने 20% MBC कोट्यातील वानियारांसाठी 10.5% देऊन केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT