आईस्क्रीम विक्रेता करत होता कोरोना रुग्णांवर उपचार, बोगस डॉक्टरला अटक
नागपूर: देशभरामध्ये कोरोनाचं (Corona) तांडव पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे संपूर्ण जग हे भीतीच्या दहशतीखाली वावरत आहे आणि याचाच फायदा उचलणारे अनेक जण या निमित्तानं समोर येत आहेत. नागपूरमध्ये (Nagpur) तर चक्क आईस्क्रीम आणि फळ विकणारा (ice cream vendor) बोगस डॉक्टर (Bogus Doctor) लोकांवर उपचार करत असल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. नागपूरच्या कामठीमध्ये […]
ADVERTISEMENT

नागपूर: देशभरामध्ये कोरोनाचं (Corona) तांडव पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे संपूर्ण जग हे भीतीच्या दहशतीखाली वावरत आहे आणि याचाच फायदा उचलणारे अनेक जण या निमित्तानं समोर येत आहेत. नागपूरमध्ये (Nagpur) तर चक्क आईस्क्रीम आणि फळ विकणारा (ice cream vendor) बोगस डॉक्टर (Bogus Doctor) लोकांवर उपचार करत असल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
नागपूरच्या कामठीमध्ये या बोगस डॉक्टरने एक धर्मार्थ दवाखाना सुरू केला. खरं तर हा बोगस डॉक्टर मागील पाच वर्षापासून तो हा दवाखाना चालवत होता. या बोगस डॉक्टरचं नाव चंदन चौधरी असं असून त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा तोतया डॉक्टर कोरोना रुग्णांवर देखील उपचार करत असल्याचे समोर आलं आहे.
Pune Bogus Doctor: कम्पाउंडरने ‘असं’ सुरु केलं होतं स्वत:चं हॉस्पिटल, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बोगस डॉक्टर चंदन चौधरी हा गेल्या अनेक वर्षांपासून फळ विकण्याचं काम करत होता. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेरिंगचं देखील काम केलं. त्यानंतर त्याने आईस्क्रीम विक्रीचा देखील व्यवसाय केला. या सगळ्यानंतर त्याने चक्क स्वत:चं रुग्णालय सुरु केलं. गेल्या पाच वर्षापासून ओम नारायण बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित धर्मार्थ दवाखाना त्याने सुरू केला आहे.









