Maharashtra Most Active Cases: महाराष्ट्रातील ‘या’ 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं थैमान, प्रचंड अॅक्टिव्ह रुग्णसंख्या

मुंबई तक

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ही आता हळूहळू संपूर्ण देशात पाहायला मिळते आहे. खरं तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात ही महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळाली आहे. आता तर महाराष्ट्रातील परिस्थिती ही अत्यंत भयंकर झाली आहे. कारण अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. तर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे तर अनेक रुग्णांचा जीव टांगणीला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ही आता हळूहळू संपूर्ण देशात पाहायला मिळते आहे. खरं तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात ही महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळाली आहे. आता तर महाराष्ट्रातील परिस्थिती ही अत्यंत भयंकर झाली आहे. कारण अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. तर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे तर अनेक रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. अशातच आता महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ ही अत्यंत झपाट्याने होत आहे. आतापर्यंत राज्यात 36 लाख 39 हजार 855 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 59 हजार 153 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात तब्बल 6 लाख 20 हजार 060 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण (Active Cases) आहेत. या आकड्यावरुन आपल्याला लक्षात येईल की, राज्यातील आरोग्य सेवेवर किती मोठ्या प्रमाणात ताण आहे.

Adar Poonawalla यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना केली कळकळीची विनंती, म्हणाले…

वाढती अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही प्रशासनाची चिंता वाढवत आहे. कारण रुग्ण संख्येच्या तुलनेने आरोग्य सेवा ही आता अपुरी पडत असल्याचं दिसतं आहे. त्यातही राज्यातील 12 जिल्हे असे आहेत की, जेथील परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे. कारण या जिल्ह्यांमधील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp