केरळमध्ये होणारी कोरोना रूग्णवाढ ही Third Wave ची सुरूवात? राजेश टोपे म्हणतात…
केरळमध्ये होणारी कोरोना रूग्णवाढ ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आम्ही महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची तयारी करतो आहोत. केंद्र सरकार आणि ICMR ने दिलेल्या निर्देशांनुसार आम्ही बालरोगतज्ज्ञांची टीमही सज्ज ठेवली आहे. ऑक्सिजन बेड, वैद्यकीय कर्मचारी आणि औषधोपचार या सगळ्याची तयारी आम्ही तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने केली आहे. आपल्या […]
ADVERTISEMENT
केरळमध्ये होणारी कोरोना रूग्णवाढ ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते असं वक्तव्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आम्ही महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची तयारी करतो आहोत. केंद्र सरकार आणि ICMR ने दिलेल्या निर्देशांनुसार आम्ही बालरोगतज्ज्ञांची टीमही सज्ज ठेवली आहे. ऑक्सिजन बेड, वैद्यकीय कर्मचारी आणि औषधोपचार या सगळ्याची तयारी आम्ही तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने केली आहे. आपल्या देशात कोरोनाची सुरूवात केरळमध्येच झाली आहे. अशात आता कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. केरळमध्ये वाढणाऱ्या रूग्णसंख्येने चिंता वाढवली आहे.
ADVERTISEMENT
बुधवारी केरळमध्ये जी कोरोना रूग्णसंख्या समोर आली आहे त्यात 22 हजार 129 रूग्ण एका दिवसात पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनच्या 156 रूग्णांचा केरळमध्ये मृत्यू झाला आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत 16 हजार 326 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात जे कोरोना रूग्णांची संख्या समोर आली त्यातले 50 टक्के रूग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. अशातच आता राजेश टोपे यांनी केरळमध्ये कोरोनाचे वाढते रूग्ण म्हणजे तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते असं म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्याही चिंतेत भर पडली आहे.
The surge in cases in Kerala can be seen as the beginning of the third wave. In Maharashtra, we are preparing for it. According to the govt and ICMR we've laid emphasis on pediatrics. We've kept oxygen, beds, medical staff& medicines prepared: Rajesh Tope, Maharashtra Health Min pic.twitter.com/g8mkWHmaPO
— ANI (@ANI) July 28, 2021
१३ जुलैला केंद्रीय आरोग्य मंत्रलायाने काय म्हटलं होतं?
हे वाचलं का?
मास्क न वापरण्यासाठी लोक कारणं सांगतात. मास्क घातला की मला श्वास घ्यायला त्रास होतो, मास्क लावला आहे की मी हनुवटीवर, मी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवलं आहे मग कशाला हवाय मास्क. अशा प्रकारची कारणं लोक सांगू लागले आहेत. हे सरळ सरळ तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं होतं. कोरोनाच्या तिसरी लाट कधी येणार? याची चर्चा होते आहे. तसंच दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आपल्या देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचीही चर्चा होते आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने लोकांच्या मास्क न वापरणाऱ्यांबाबत आणि कोरोना प्रोटोकॉल न पाळणाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
20 जुलैला आरोग्य मंत्रालयाने काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रलयाने 20 जुलै रोजी चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर केले. यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की देशभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये कोरोनाविरोधी अँटीबॉडीज विकसित झाल्या असल्याचं समोर आलंय. असं असलं तरीही सुमारे 40 कोटी भारतीयांना धोका असल्याची भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सेरो सर्व्हेनुसार हे दिसून आलं की 6 ते 17 या वयोगटातील 50 टक्क्यांहून अधिक मुलांना कोव्हिडचा संसर्ग झाला व त्यांच्यात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा केरळमध्ये वाढते रूग्ण ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
Corona Protection: दुहेरी संरक्षणासाठी दुहेरी मास्क का आहे आवश्यक?
तिसरी लाट आणि डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात अद्यापही तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. हे निर्बंध 31 ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत आता काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT