ठाकरे सरकारला आत्मचिंतन करण्याची गरज- फडणवीस

मुंबई तक

महाराष्ट्रातलं सगळं प्रशासन पॅरेलाईज झालं आहे असं मी म्हणणार नाही. मात्र महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. १६ वर्षे निलंबित असलेल्यांना पुन्हा सेवेत घेतलं जातं. त्यांच्याकडून मुकेश अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला जातो, खंडणी मागतली जाते त्यामुळे या प्रकरणी सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

महाराष्ट्रातलं सगळं प्रशासन पॅरेलाईज झालं आहे असं मी म्हणणार नाही. मात्र महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. १६ वर्षे निलंबित असलेल्यांना पुन्हा सेवेत घेतलं जातं. त्यांच्याकडून मुकेश अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला जातो, खंडणी मागतली जाते त्यामुळे या प्रकरणी सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहे. दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट हा फडणवीसांचा आरोप नवाब मलिकांनी तोच रिपोर्ट दाखवून कसा खोडला?

आणखी काय म्हणाले फडणवीस?

माझ्याकडे जे काही पुरावे होते ते पुरावे मी केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत. पोलीस दलाच्या बदलीच्या रॅकेटकडे हे पुरावे मी दिले आहेत. पोलिसांच्या बदलीच्या रॅकेटचे पुरावे दिले आहेत. २५ ऑगस्टचं पत्र आत्तापर्यंत दाबून का ठेवलं असाही प्रश्न देवेंद्र फडणीवस यांनी विचारला. केंद्रीय गृहसचिवांकडे मी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फोन टॅपिंग प्रकरणातले पुरावे दिले आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे वाचलं का?