Theatre Reopen : अखेर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होणार; ठाकरे सरकारने तारीख केली जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली असून, राज्य सरकारने हळूहळू जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. शाळा आणि धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या निर्णयानंतर आता चित्रपट व नाट्यगृहांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट राज्यात ओसरली आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानं राज्य सरकारने निर्बंध शिथील करताना सावध पावलं टाकली होती. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्याचं चित्र असून, राज्य सरकारनेही हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथील करण्यास सुरूवात केली आहे.

राज्यात ऑक्टोंबरपासून शाळा सुरू होत आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळ उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध नियमावली ठरवून देत सरकारने या दोन्ही गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर आता बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच चित्रपटगृह आणि नाट्यगृह यांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे. राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृहं २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविड नियमांचं पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहं सुरू केली जाणार आहेत. याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्याचं काम सुरू असून, लवकरच जाहीर करण्यात येतील, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक राज्यांनी झटपट निर्बंध हटवत सर्व गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली होती. धार्मिक स्थळं, शाळा, मॉल्स याबरोबरच चित्रपटगृह नाट्यगृहंही सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे राज्यातील भारतीय मल्टिप्लेक्स असोसिएशननं दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चित्रपटगृह सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT