Mahima Chaudhary ने उघड केली बॉलिवूडमधली ही धक्कादायक गोष्ट, म्हणाली आधी लोकांना त्याच अभिनेत्री हव्या असायच्या ज्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘परदेस’ या चित्रपटाद्वारे सर्वांच्या आठवणीत राहिलेली अभिनेत्री महिमा चौधरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती बोलण्यास कधीही कुचरत नाही. महिमाच्या मते चित्रपटसृष्टीत आताच्या अभिनेत्रींना जशी वागणूक दिली जाते, तशी चांगली वागणूक काही वर्षांपूर्वी लोकांकडून दिली जात नव्हती. या अगोदरची चित्रपटसृष्टी ही सर्वाधिक पुरुषप्रधान होती, असे महिमा चौधरीने म्हटले आहे.

ADVERTISEMENT

आपले म्हणणे विस्तृतपणे मांडताना महिमा म्हणाली की, अभिनेत्रींनाही आता सीन मिळत आहे, अशी स्थिती सध्या चित्रपटसृष्टीमध्ये आली आहे. त्यांना चांगल्या भूमिका मिळत आहेत, चांगले पैसेही मिळत आहेत. त्या चांगल्या आणि पावरफुल पोझिशनवर पोहोचलेल्या आहेत. त्यांना पूर्वीपेक्षा चांगले जीवन जगता येत आहे.१९९७ मध्ये परदेस या चित्रपटात आपले करिअर सुरू करणाऱ्या महिमा चौधरीच्या मते, पूर्वी अभिनेत्रींच्या रिलेशनशीप स्टेटसचा प्रभाव त्यांच्या व्यावसायिक आयुष्य आणि कामांच्या संधींवर पडत होता. तुम्ही कोणाला डेट करणे सुरू केले, तेव्हा लोक तुमच्याबद्दल लिहायला सुरुवात करत होते. कारण सिनेमांसाठी अशाच अभिनेत्री हव्या होत्या ज्यांनी कधीही किस केले नसेल आणि त्या व्हर्जिन असतील. जर तुम्ही कोणासोबत डेटिंग करत असाल तर त्याची प्रतिक्रिया अशी होती, ‘ओह! ती तर डेट करत आहे! जर तुमचे लग्न झाले असेल, तर तुम्ही विसरून जा. तुमचे करिअर संपले. जर तुम्हाला मुले असतील तर करिअर पूर्णपणे विसरून जा.

‘गोविंदा आणि आमिर खानचा उल्लेख करताना महिमा म्हणाली की, ‘ही गोष्ट कयामत से कयामत तक चित्रपट आला तेव्हाची आहे. आम्हाला तर ठाऊकच नव्हते की आमिर खानचे लग्न झाले आहे. गोविंदाचीही अशीच परिस्थिती होती. लोक त्यांच्या मुलांचे फोटो दाखवत नव्हते, एक्सपोजही करत नव्हते. असे केल्यास अभिनेत्यांचे वय कळत होते. या सर्व गोष्टी आता बदलल्या आहेत.’महिमा म्हणाली की, ‘तुम्हाला करिअर सुरू ठेवायचे आहे की खासगी आयुष्य निवडायचे आहे, हे आता रिलेशनशिप स्टेटस ठरवत नाही. पूर्वी असे होते, परंतु आता तुम्ही लग्न आणि करिअर दोन्हीही करू शकतात. महिलांना वेगवेगळ्या भूमिकेत पाहणेसुद्धा आता लोकांना आवडायला लागले आहे. पूर्वी अनेक पुरुष आपले रिलेशनशिप स्टेटस लपवत होते.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT