पुण्यात लक्ष्मीपुजनाच्या दिवशी IAS अधिकाऱ्याच्या घरात दरोडा, ४३ लाखांचा मुद्देमाल लंपास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे शहरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना लक्ष्मीपुजनाच्या दिवशी एका घरात दरोडा पडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या मुंढवा परिसरात राहणारे IAS अधिकारी सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या घरात चोरी झाली असून चोरांनी १५० तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रुपये रोख असा ४३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

ADVERTISEMENT

सागर डोईफोडे हे IAS अधिकारी असून ते सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. सागर यांचे वडील दत्तात्रय डोईफोडे हे देखील महसूल विभागातील सेवानिवृत्त वरिष्ठ कर्मचारी आहेत. चोरट्यांनी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी रात्री साडेअकरा वाजता घरफोडी करुन हा लाखांचा मुद्देमाल चोरला आहे. दत्तात्रय डोईफोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दाखल केली आहे.

लग्न का करुन देत नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या

हे वाचलं का?

लक्ष्मीपुजनासाठी डोईफोडे यांनी घरातले सर्व पारंपरिक दागदागिने पुजेसाठी बाहेर काढले होते. ज्यात मंगळसूत्र, नेकलेस, मोहनमाळ, बांगड्या, तोडे, ब्रेसलेट, पाटल्या, हिऱ्यांचे सेट आणि अडीच लाख रोख रक्कम होती. डोईफोडे यांचे घर गुरुवारी रात्री साडेअकरा ते शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत कुलुपबंद होते. यावेळीच चोरट्यांनी बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून आणि हॉलच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला.

दरम्यान, मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाला सुरुवात केली आहे. ज्यावेळी घरात चोरी झाली, त्यावेळी दोन नोकरमाणसं होती, परंतू ती गाढ झोपेत होती. चोरांनी चोरी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पायातल्या चपला सोडून दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी श्वानपथकाच्या सहाय्याने तपासाला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT