मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक; कळंब शहरात हजारोंच्या संख्येत काढण्यात आला मोर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठा समाजाकडून पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून शांत असलेला मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी सक्रिय झालेला पहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये दुसऱ्या पर्वाचा राज्यातील पहिला महामोर्चा पुकारण्यात आला होता. सोमवारी हजारोच्या संख्येत कळंब शहरामध्ये मराठा समाजातील महिला, वृद्ध, लहान मुलं यांसह विद्यार्थी देखील मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरले होते. मराठा समाजातील वकील, डॉक्टर यांसह इतर क्षेत्रातीलmमान्यवर मंडळी देखील सहभागी झाले होते.

ADVERTISEMENT

महिलांची संख्या लक्षणीय

हे वाचलं का?

मराठा समाजाने विविध मागण्यासाठी जवळपास 58 मूक मोर्चे काढले होते. 9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईत शेवटचा मोर्चा निघाला होता. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे मराठा समाज आता आक्रमक भूमिकेत दिसत आहे. सोमवारी पार पडलेल्या महामोर्च्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. विद्यार्थिनी, महिला या मोर्च्यात पुढे चालत होते. पाऊस पडत असला तरी एक मराठा लाख मराठा म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ADVERTISEMENT

मुस्लिम समाजाकडून पुष्पवृष्ठी; पाणी आणि अल्पोपहाराची देखील सोय

ADVERTISEMENT

दुपारी 12 वाजताच्या दरम्यान मोर्च्याला सुरुवात झाली होती. इतर गावातून देखील मराठा समाजातील लोक कळंबमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपहाराची सोय मुस्लिम समाजातील आझाद ग्रुपच्यावतीने करण्यात आली होती. तर जमियत उलेमा ए हिंदच्या मौलाना मंडळींनी मराठा बांधवांवर गुलाबाच्या पाकळ्या उधळून स्वागत केले. असा भाईचाराचा नजारा कळंब शहरात पाहायला मिळाला. तर जैन समाजाच्यावतीने चहापानाची सोय करण्यात आली होती.

50 टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसी प्रवर्गात आरक्षणाची मागणी

वेळ पडल्यास अधिक आक्रमक भूमिका घेऊन आमच्या हक्काचं आरक्षण घेऊनच राहू, अशी वलग्ना मराठा समाजातील लोकांनी केली. विदर्भांप्रमाणे मराठवाड्यात देखील मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात यावं, अशी विशेष मागणी देखील यात करण्यात आली. त्याचबरोबर 50 टक्क्यांच्या मर्यादेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी प्रमुख मागणी यादरम्यान करण्यात आली.

धो-धो पाऊस आणि मोर्चा

विद्याभवन शाळेपासून निघालेल्या मोर्च्याची सांगता एका शाळेच्या भव्य मैदानावर झाली. यादरम्यान 5 मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. धोधो पावसात देखील मैदानावर मराठा समाज ठाण मांडून होता, हे विशेष. आता मराठा समाज यापुढे आरक्षणाच्या मागणीसाठी काय भूमिका घेतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT