तीन प्रभाग पद्धतीविरोधात काँग्रेसचा ठराव : नाना पटोलेंनी भूमिका केली स्पष्ट
राज्यातील महाविकास आघाडी महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याच्या निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला आता काँग्रेसनं विरोध केला असून, तसा ठरावही मंजूर केला आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावामागील भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केली. राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात […]
ADVERTISEMENT
राज्यातील महाविकास आघाडी महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याच्या निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला आता काँग्रेसनं विरोध केला असून, तसा ठरावही मंजूर केला आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावामागील भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा त्याला विरोध आहे. याबद्दल नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं.
नाना पटोले म्हणाले, ‘जनतेच्या भावना आणि कार्यकर्त्यांची मतं विचारात घेणं हे संघटनेचं काम आहे. सरकारची कुठली भूमिका असेल आणि जनतेचा त्याला विरोध असेल, तर पक्ष संघटना म्हणून जी भूमिका मांडणे योग्य आहे ती आम्ही मांडू आणि कालच्या आमच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये भूमिका मांडलेली आहे’, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
‘राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांना वेड्याचा झटका’, प्रभाग पद्धतीवरुन मनसेची तुफान टीका
‘तीन पक्षांचं सरकार आहे. भूमिका वेगवेगळ्या असू शकतात. आमच्या पक्षाची भूमिका आम्ही आमचे नेते बाळासाहेब थोरात त्यांनासुद्धा कळलेली होती, परंतु जो निर्णय झालेला आहे; त्यावर पुढच्या कॅबिनेटमध्ये पुनर्विचार व्हावा, अशी मागणीसुद्धा आम्ही केलेली आहे’, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
Congress चा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध, केली महत्वाची मागणी
ADVERTISEMENT
महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निर्णयाला काँग्रेसमधून विरोध झाला आहे. काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या निर्णयाला विरोध आहे. तीन ऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. तसा ठरावही काँग्रेसच्या कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. यावर आता सरकारमधील तिन्ही पक्ष काय भूमिका घेणार हे आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT