‘केंद्रात बदल घडवू, 2024 ला सत्तांतरासाठी काम करू’! विरोधकांच्या रॅलीत शरद पवारांचा एल्गार

मुंबई तक

‘मी वचन देतो की, शेतकऱ्याला कर्जाच्या कारणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, कारण आपण मिळून सरकार बदलू. केंद्रातील सरकार हटवू आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचं काम करू’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात एकजूट होण्याचं आवाहन विरोधकांना केलं. हरयाणातल्या फतेहाबाद येथे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षाची संयुक्त […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘मी वचन देतो की, शेतकऱ्याला कर्जाच्या कारणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, कारण आपण मिळून सरकार बदलू. केंद्रातील सरकार हटवू आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचं काम करू’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात एकजूट होण्याचं आवाहन विरोधकांना केलं.

हरयाणातल्या फतेहाबाद येथे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षाची संयुक्त रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

विरोधकांच्या रॅलीत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘२०२४ मध्ये केंद्रातील सरकार बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आलीये. शेतकरी आत्महत्या करून आयुष्य संपवत आहेत. हा पर्याय नाहीये. सरकार बदलणे हाच खरा पर्याय आहे’, असं मत पवारांनी मांडलं.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘एक वेळ अशी होती, जेव्हा देशात अन्नधान्याचा तुडवडा होता. तेव्हा शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतलं. त्यामुळे देशातली स्थिती बदलली. आपला देश कृषी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे आणि यामागे फक्त शेतकऱ्यांचे कष्ट आहेत’, असं पवारांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp