टीना डाबी होणार महाराष्ट्राची सून; ‘या’ मराठी अधिकाऱ्यासोबत बांधणार लगीनगाठ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयएस अधिकारी टीना डाबी या पुन्हा एकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. राजस्थान बॅचचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार आहेत. टीना डाबी यांनी स्वतःच ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. टीना डाबी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबाबत पोस्ट करून आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

टीना डाबी यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसंच आपण लवकरच लग्न करणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलं आहे. टीना डाबी यांनी केलेल्या या पोस्टची सोशल मीडियार चांगलीच चर्चा आहे. तसंच त्या ज्यांच्याशी लग्न करणार आहेत ते प्रदीप गावंडे कोण आहेत याचा शोध सोशल मीडियावर लोक घेत आहेत.

हे वाचलं का?

टीना डाबी या राजस्थान कॅडरच्या २०१३ च्या बॅचरचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्न करणार आहेत. प्रदीप हे सध्या जयपूरमध्ये कर्तव्यावर आहेत. टीना डाबी या देखील जयपूरमध्येच सेवेत आहेत. प्रदीप गावंडे हे टीना डाबी यांना १३ वर्षे सीनियर आहेत. २०१३ मध्ये त्यांनी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. प्रदीप गावंडे हे महाराष्ट्राचे आहेत. प्रदीप यांनी MBBS ची डिग्री घेतली त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि त्यात घवघवीत यश मिळवलं.

प्रदीप यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० ला महाराष्ट्रात झाला आहे. त्यांचं नाव प्रदीप केशवराव गावंडे असं त्यांचं संपूर्ण नाव आहे. ते टीनापेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. प्रदीप यांनी नाशिकच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून सेकंड डिव्हिजन मिळवत MBBS केलं आहे. त्यानंतर त्यांनी यूपीएससी केलं. २०१५ च्या यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवल्याने टीना डाबी या चर्चेत आल्या होत्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

२०१८ मध्ये टीना आणि अलहर यांचं लग्न झालं होतं. हे हायप्रोफाईल लग्न चर्चेत आलं होतं. मात्र दोन वर्षात दोघांचा घटस्फोट झाला. दोघांचा डिव्होर्स झाला त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा झाली होती. या दोघांची सोशल मीडियावर खूप चर्चा होती. दोघेही अनेकदा एकमेकांशी चर्चा करत असत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT