Pandharpur: शेगावसारखे प्रति ‘आनंद सागर’ पंढरपूरमध्ये व्हायला हवे, निलम गोऱ्हेंचे प्रशासनाला निर्देश
पंढरपूर: तीर्थक्षेत्र शेगावमधील ‘आनंद सागर’ प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूर मध्ये व्हायला हवे, हे उद्यान उभा करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. पंढरपूर शहरातील विकासकामे अन श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी गोऱ्हे यांनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत प्रांताधिकारी सचिन ढोले, […]
ADVERTISEMENT

पंढरपूर: तीर्थक्षेत्र शेगावमधील ‘आनंद सागर’ प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूर मध्ये व्हायला हवे, हे उद्यान उभा करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले.
पंढरपूर शहरातील विकासकामे अन श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी गोऱ्हे यांनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्याधिकारी अरविंद माळी, पत्रकार सुनील उंबरे यांनी सहभाग घेतला.
पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. दर्शनानंतर त्यांना क्षणभर विरंगुळा घेण्यासाठी एक प्रसन्न, प्रशस्त आणि शांत जागा असायला हवी.
शेगावमध्ये आनंद सागर हे सुंदर उद्यान उभारले आहे. पंढरपूरमध्ये असे एक उद्यान असायला हवे नगरपरिषदेने अशा उद्यानासाठी तातडीने एक प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले.