चिंताजनक बातमी, महाराष्ट्रात 11 हजाराहून जास्त नवे Corona रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यातील जनतेची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. त्यातच गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 11,141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अवघ्या एका दिवसात 10 हजारांच्या वर रुग्ण सापडल्याने प्रशासन देखील हादरुन गेलं आहे. तसंच कोरोना पॉझिटिव्हिटी रेट देखील 13.16 टक्के एवढा झाला आहे. जो फारच अधिक असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील जवळजवळ 1 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. जी अत्यंत चिंताजनक बाब समजली जात आहे. आता या सगळ्याप्रकरणी राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

गेल्या 24 तासात राज्यात सापडले 11,141 पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 11,141 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 38 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्के एवढा आहे. याशिवाय आणखी एक चिंतेची बाब म्हणजे आता राज्यात 97,983 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचलं का?

दुसरीकडे एक चांगली बाब म्हणेज आज राज्यात 6,013 कोरोना रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 20,68,044 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 93.17 टक्के इतका आहे.

Corona virus : नागपुरात आता १४ मार्चपर्यंत कडक निर्बंध

ADVERTISEMENT

आज मुंबईत 1361 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात 1427 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नागपूरमध्ये 1358 आणि अमरावतीमध्ये 595 नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत

ADVERTISEMENT

  1. राज्यात 22,19,727 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • त्यापैकी 20,68, 044 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  • राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 52,487 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

  • सध्या राज्यात 97,983 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,68,67,286 नमुन्यांपैकी 22,19,727 (13.16 टक्के ) नुमने हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,39,055 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,650 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT