धक्कादायक घटना, मळणी मशीनमध्ये अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगली: सांगली जिल्ह्यातील करंजे गावात एक अत्यंत धक्कदायक घटना घडली आहे. शेतात काम सुरु असतानाच मळणी मशीनमध्ये अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभद्रा विलास मदने असं मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

खानापूर तालुक्यातील करंजे येथील मदने मळा येथे मळणी मशिनमध्ये पदर अडकल्याने सुभद्रा मदने या अतिशय वेगाने मशीनमध्ये ओढल्या गेल्या. त्यामुळे त्या थेट मशीनमध्ये अडकल्याने सुभद्रा यांचा जागीच मृत्यू झाला. हे सारं काही अवघ्या काही क्षणात घडलं की, सुरुवातीला नेमकं काय झालंय कुणालाचा समजू शकलं नाही. यावेळी मळणी चालकाने मशीन तात्काळ बंद करण्याचा देखील प्रयत्न केला. पण तोवर फारच उशीर झाला होता.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणाची तात्काळ माहिती घेतील. तसंच सुभद्रा यांचा मृतदेह करंजे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हे वाचलं का?

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रेलर-ट्रकचा भीषण अपघात

सुभद्रा मदने यांनी गव्हाच्या कुड्या (कणसे) वेचण्यास सुरवात केली. सर्व कुड्या वेचून त्या मशीनमध्ये टाकत असताना ट्रॅक्टरच्या आणि मशीनच्या राँड फॅन बेल्टमध्ये त्यांच्या साडीचा पदर अडकला. पदर मळणी मशिनमध्ये गेल्याने त्यांचे संपूर्ण शरीर मशीनमध्ये ओढले गेले आणि त्या जागीच ठार झाल्या. यावेळी झालेल्या घटनेत सुभद्रा यांचा मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत आढळून आला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण मदने कुटुंबीयांवर शोककळा कोसळली आहे. तसेच संपूर्ण गावावर देखील शोककळा कोसळली होती. सध्या, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मिळते आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT