प्रशासकीय बदल्या : ठाण्याचे दोन्ही कारभारी बदलले; तुकाराम मुंडेंना पुन्हा साईड पोस्टिंग
मुंबई : राज्यातील 44 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशीरा शिंदे-फडणवीस सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासना आदेश पारित केला. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही समावेश आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त या दोघांचीही बदली करण्यात आली आहे. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची बदली राजशिष्टाचार विभागाच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यातील 44 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशीरा शिंदे-फडणवीस सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासना आदेश पारित केला. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही समावेश आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त या दोघांचीही बदली करण्यात आली आहे.
पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची बदली राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. म्हैसकर यांच्याकडे मराठी भाषा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार असणार आहे. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची बदली राज्य उत्पादन शुल्क व विमान चालन प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांची बदली आदिवासी विभाग अपर मुख्य सचिव या पदावर करण्यात आली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचीही बदली करण्यात आली आहे. चर्चेतील सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचीही बदली झाली आहे. मात्र त्यांना पुन्हा साईड पोस्टिंग देण्यात आली आहे. फॉक्सकॉन-वेदांताच्या वादानंतर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन पी. यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी : नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण
-
श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे)










