Twitter Edit Button : ट्विटरवर आता ट्विट एडिट करण्याचा पर्याय, युजर्सची मागणी मान्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Twitter Edit Button ची मागणी ट्विटर युजर्सकडून होत होती. ती मागणी अखेर मान्य झाली आहे. ट्विटरने हा पर्याय युजर्सना उपलब्ध करून दिला आहे. टेस्लाचे CEO यांनीही ट्विटरवर एडिट बटण हवं ही मागणी केली होती जी मागणी आता मान्य करण्यात आली आहे. ट्विटर लवकरच हा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.

ADVERTISEMENT

व्हेरिफाईड अकाऊंट असणाऱ्यांना करता येणार ट्विट एडिट

अनेकदा ट्विट केल्यानंतर त्यात चूक असते. ती नंतर लक्षात येते मग, ट्विट डिलिट करण्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण ट्विट एडिटचा पर्याय नव्हता. मात्र ट्विटरने आता पर्याय आणला आहे. लवकरच ट्विटर युजर्सना एडिटचा पर्याय मिळणार आहे. व्हेरिफाईड सुरूवातीला ही सुविधा मिळणार आहे. व्हेरीफाईड अकाऊंट असणाऱ्या युजर्सना ट्विट एडिट करता येणार आहे.

ट्विटरने हा पर्याय युजर्सना देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट एडिट करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. सुरूवातीच्या टप्प्यात व्हेरिफाईड अकाऊंट असणाऱ्यांना म्हणजेच ब्लू टीक असणाऱ्यांनाच हा पर्याय उपलब्ध होणार आहे. ब्ल्यू टिक असलेल्या सदस्यांना दरमहा ४.९९ डॉलर्समध्ये हे फिचर उपलब्ध होणार आहे.

हे वाचलं का?

फेसबुक आणि इंस्टाग्राम यांनी महिन्याभरात दोन कोटींपेक्षा जास्त पोस्ट का डिलिट केल्या?

३० मिनिटांपर्यंत एडिट करता येणार ट्विट

ट्विट केल्यानंतर युजरला अर्ध्या तासापर्यंत म्हणजेच ३० मिनिटांपर्यंत हे ट्विट एडिट करता येणार आहे. सध्या ट्विटरने एडिट बटणची टेस्टिंग सुरू केली आहे. तुम्ही ट्विट केल्यावर जर तुम्हाला एडिटचा पर्याय दिसत असेल तर टेस्टिंगमुळे तो दिसतोय. लवकरच हा पर्याय उपलब्ध होईल. सुरूवातीच्या टप्प्यात फक्त व्हेरिफाईड अकाऊंट असणाऱ्यांनाच एडिट बटण मिळणार आहे.

ADVERTISEMENT

या नव्या पर्यायामुळे काय होणार?

ट्विटरने दिलेल्या नव्या पर्यायामुळे तुम्हाला तुमचं ट्विट बदलता येणार आहे. या ट्विटमध्ये तुम्हाला तुमच्या ट्विटची हिस्ट्रीही पाहता येणार आहे. तुम्ही केलेला मूळ ट्विट काय होता? त्यामध्ये तुम्ही एडिट करून काय बदल केले? ते बदल कुठले आहेत हे सगळं तुम्हाला दिसणार आहे. भारतात ही सेवा कधीपासून सुरू होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र सुरूवातीला व्हेरिफाईड अकाऊंट असणाऱ्या युजर्सनाच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तसंच तुमचं ट्विट कुणी पाहिलं हेदेखील तुम्हाला आता कळणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT