Twitter Down : एका आठवड्यात दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन, नेटकऱ्यांकडून तक्रारींचा पाऊस
एका आठवड्यात दुसऱ्यांना ट्विटर डाऊन झाल्याने अनेक नेटकऱ्यांचा हिरमोड झाला. गुरूवारी रात्री ट्विटर डाऊन झालं. त्याचा फटका अनेक युजर्सना बसला आहे. ट्विटर अकाऊंवर अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी अनेक युजर्सनी सुरू केल्या. युजर्सना स्वतःचे ट्विट पाहण्यासाठीही अडचणी येत होत्या. मॉनिटरिंग साईट डाउनडिटेक्टर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार ट्विटर युजर्सनी सांगितले की, ट्विटरवर गुरूवारी रात्री काही टेक्निकल अडचणी […]
ADVERTISEMENT

एका आठवड्यात दुसऱ्यांना ट्विटर डाऊन झाल्याने अनेक नेटकऱ्यांचा हिरमोड झाला. गुरूवारी रात्री ट्विटर डाऊन झालं. त्याचा फटका अनेक युजर्सना बसला आहे. ट्विटर अकाऊंवर अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी अनेक युजर्सनी सुरू केल्या. युजर्सना स्वतःचे ट्विट पाहण्यासाठीही अडचणी येत होत्या.
मॉनिटरिंग साईट डाउनडिटेक्टर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार ट्विटर युजर्सनी सांगितले की, ट्विटरवर गुरूवारी रात्री काही टेक्निकल अडचणी येत होत्या. ज्या रात्री 10.51 नंतर वाढायला लागल्या. गेल्या आठवड्यात 11 फेब्रुवारीला रात्री 11 च्या सुमारास ट्विटर डाऊन झाले होते. त्यावेळी कंपनीने म्हटले होते की, आम्ही एक बग ठिक केला आहे. ज्यामुळे टाईमलाईन अपलोड करण्यात अडचण येत होती. अशात पुन्हा एकदा ट्विटर डाऊन झालेलं पाहण्यास मिळालं.
रात्री जेव्हा ट्विटर डाऊन झालं तेव्हा भारतातील अनेक शहरातील युजर्सना ट्विटर वापरण्यास अडचणी येत होत्या. यामध्ये मुंबई, दिल्ली, जयपूर, हैदराबाद आणि चेन्नईसह इतर शहरांचा देखील समावेश होता. त्यावेळी यूजर्सनी ट्विट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तसेच ट्विटवर आलेले रिप्लायही लोड होत नाही असंही युजर्स सांगत होते.