पाहुणा म्हणून आला अन् घरी परतलाच नाही, दोन सख्ख्या मावस भावांचा दुदैवी अंत

मुंबई तक

ADVERTISEMENT

two brothers drowned in warna river walwa district tandulwadi village
two brothers drowned in warna river walwa district tandulwadi village
social share
google news

Two brothers drowned in warna river : सांगली (Sangali News) जिल्ह्यातील वारणा नदीत (warna river) बुडून दोन सख्ख्या मावस भावांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. अमोल प्रकाश सुतार ( वय 16) आणि रविराज उत्तम सुतार (वय 12 ) अशी मृत मुलांची नावे आहेत. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी (tandulwadi village) गावात ही घटना घडली आहे.या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या घटनेतील एक तरूण गावात पाहूणा म्हणून आला होता, मात्र त्याचा दुदैवी अंत झाला. (two brothers drowned in warna river walwa district tandulwadi village shocking crime story)

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील मुळचा राजमाची गावचा रहिवासी असलेला रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे तांदुळवाडी गावात आला होता. आपला मावस भाऊ आल्याने अमोल सुतारला आनंद झाला होता. दोघांनी मजामस्ती करण्याचा बेत आखला होता. मात्र भलतंच घडलंय.

हे ही वाचा : लिव्ह इन रिलेशन, मृतदेहाचे तुकडे तुकडे अन् फ्रिज…श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती!

दोघेही वैरण काढायला नदीला जाऊया असे सांगून ते वारणा नदीकाठाला गेला होता. वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर दोघे भाऊ नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते.त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घडना घडली. या घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्यात कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्यासह पोलीस उप निरीक्षक विजय पाटील यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्सचे विनायक लांडगे व सुनील जाधव यांच्या टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. या टीमने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रविराज सुतार सातवीत शिकत होता. त्याचे आई वडील रोजंदारी करून आपल्या मुलाला संगोपण करत होते. पण आज त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची व रविराज यांच्या घरी शोककळा पसरली आहे. तर अमोल प्रकाश सुतार हा आई वडीलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच होती. त्यांनी देखील त्यांचा मुलगा गमावल्याने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या दोन्ही सख्खा मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची नोंद कुरळप पोलिसात करण्यात आली आहे.या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : CCTV: शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला जागीच केलं ठार, उल्हासनगर हादरलं!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT