आजी-माजी मुख्यमंत्री भाषणात व्यस्त, भाजपनं साधला डाव; दोन माजी आमदारांचा पक्षप्रवेश

मुंबई तक

पालघर: शिवसेनेत सध्या वाद सुरु आहे. एका टोकाला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या टोकाला एकनाथ शिंदे आहेत आणि या सगळ्यात भाजपही समोर येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. तसं म्हटलं तर एकनाथ शिंदेंनी आम्हीचच खरी शिवसेना म्हणत भाजपसोबत नैसर्गिक युती केली आहे. असं असताना आता शिवसेनेतील नेते भाजपसोबत गेल्याने चर्चांना उधान आलं आहे. आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं सुरु […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

पालघर: शिवसेनेत सध्या वाद सुरु आहे. एका टोकाला उद्धव ठाकरे तर दुसऱ्या टोकाला एकनाथ शिंदे आहेत आणि या सगळ्यात भाजपही समोर येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. तसं म्हटलं तर एकनाथ शिंदेंनी आम्हीचच खरी शिवसेना म्हणत भाजपसोबत नैसर्गिक युती केली आहे. असं असताना आता शिवसेनेतील नेते भाजपसोबत गेल्याने चर्चांना उधान आलं आहे.

आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं सुरु असतानाच भाजपनं डाव साधला

21 सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या गटनेत्यांचा मेळावा घेतला, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, शिंदे गटातील आमदार, खासदार, भाजपचे वरिष्ठ नेते आणि अमित शाहांनाही टार्गेट केलं. या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनीही दिल्लीतून संवाद साधला आणि ठाकरेंच्या भाषणाला उत्तर दिलं. आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं सुरु असतानाच भाजपने डाव साधला आहे. आता तो डाव एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना जड जाणार आहे.

महाराष्ट्र सदनातून एकनाथ शिंदे 20 मिनीटासाठी अचानक झाले गायब, चर्चांना उधान

दोन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

बोईसरचे माजी आमदार विलास तरे आणि पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाच नाही तर शिंदे गटालाही हा मोठा धक्का समजला जात आहे.