औरंगाबादमध्ये दोन महिलांवर सामूहिक बलात्कार, सात ते आठ जणांनी घातला दरोडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील एका गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला चढवला. मात्र, या वेळी या ठिकाणी असलेल्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटनासमोर आली आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी घरातील वस्तू आणि पैसेही या दरोडेखोरांनी चोरले आहेत.

कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. ज्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार झाला त्यातल्या एका महिलेला आठ महिन्यांचं बाळ आहे. ही बाब लक्षात आली असूनही दरोडेखोरांनी हे अमानुष कृत्य केलं.

काही दिवसांपूर्वीच औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक राजन शिंदे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. 16 ऑक्टोबरलाच या हत्येचा उलगडा करण्यात आला असून एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. गुन्हेगारीचं हे प्रकरण ताजं असतानाच आता सामूहिक बलात्कार आणि दरोड्याचं प्रकरण समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT