दोन महिला अचानक भेटल्या, एकमेकींचं गुपितही समजलं.. नंतर दोघींनी पतीलाही दिलं सोडून!
टोरी आणि सोल नावाच्या दोन स्त्रिया विवाहित होत्या. दोघांनीही आपआपल्या पतीसोबत दीर्घकाळ एकत्र राहण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या. पण जेव्हा दोन्ही महिला एकमेकांच्या प्रेमात पडल्या तेव्हा त्या चक्क पतीपासूनच विभक्त झाल्या. कन्सेंटिंग अॅडल्ट्स (Consenting Adults) नावाच्या पॉडकास्टमध्ये, दोन्ही महिलांनी त्यांची स्वतःची जीवनकहाणी शेअर केली आहे. टोरी आणि सोल यांची भेट तेव्हा झाली होती जेव्हा त्या […]
ADVERTISEMENT

टोरी आणि सोल नावाच्या दोन स्त्रिया विवाहित होत्या. दोघांनीही आपआपल्या पतीसोबत दीर्घकाळ एकत्र राहण्यासाठी अनेक योजना आखल्या होत्या. पण जेव्हा दोन्ही महिला एकमेकांच्या प्रेमात पडल्या तेव्हा त्या चक्क पतीपासूनच विभक्त झाल्या. कन्सेंटिंग अॅडल्ट्स (Consenting Adults) नावाच्या पॉडकास्टमध्ये, दोन्ही महिलांनी त्यांची स्वतःची जीवनकहाणी शेअर केली आहे.
टोरी आणि सोल यांची भेट तेव्हा झाली होती जेव्हा त्या दोघीही त्यांच्या पतीसोबत बायसेक्शुअल महिलांसाठी बनविण्यात आलेल्या क्लबमध्ये गेल्या होत्या. खरं म्हणजे पहिल्या भेटीनंतर काही दोन्ही महिलांमध्ये अफेअर सुरू झालं नाही. मात्र, काही दिवसानंतर दोन्ही महिलांनी पतीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
महिलांनी सांगितले की, त्यांनी नंतर ठरवले की दोघींनाही ओपन रिलेशनशिपचा प्रयत्न करायचा होता. टोरीन यावेळी असंही सांगितलं की, ‘आमच्या दोघींचं एकमेकींशी खूपच रोमँटिक कनेक्शन असल्याचे आम्हाला जाणवले. म्हणूनच आम्ही एकमेकींच्या जवळ येत गेलो.
टोरीने पुढे असंही सांगितलं की, ‘मी पतीपासून विभक्त होण्यापूर्वीच माझ्या पतीला माझ्याबद्दल सर्व काही माहित होते. पतीसोबत या सगळ्याविषयी मी खूप चर्चा देखील केली. सुरुवातीला, आम्हाला असं वाटत होतं की, आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो आहोत, परंतु भविष्यात आपलं नातं काय असेल हे नेमकं माहित नव्हतं. त्यामुळेच मी पतीपासून विभक्त झाली.’ असं टोरीने म्हटलं.