रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला कोयनेतून पाणी पुरवणार : उद्योगमंत्री सामंत यांची घोषणा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : राजापूरमधील प्रस्तावित बारसू-सोलगाव येथील रिफायनरीला सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाणी पुरवठा करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी बैठकीतील रिफायनरीबाबत घेण्यात आलेल्या इतरही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली.

ADVERTISEMENT

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये रिफायनरीसाठी सुरु असलेल्या भुसंपादनची आणि रिफायनरी कशा पद्धतीने होणार आहे याबाबत माहिती देण्यासाठी आज स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत आणि सर्व अधिकाऱ्यांची उदय सामंत यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

मात्र विनायक राऊत या बैठकीला अनुपस्थित होते. या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी यापूर्वीच सांगितलं असल्याचं सामंत म्हणाले. याशिवाय पुढच्या टप्प्यात विरोधातील आणि समर्थन करत असलेल्या शेतकऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

बारसू-सोलगाव रिफायनरीला कोयना धरणातून पाणी पुरवणार :

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, या बैठकीत आमदार राजन साळवी यांनी अर्जूना आणि जामदा डॅममधून पाणी उपसा केल्यास स्थानिक पातळीवर पाणी टंचाई होऊ शकते, असं मत मांडलं. आमचा देखील तोच सर्वे आहे. त्यामुळे आता कोयना धरणातून पाणी पुरवठा करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

यासाठी कोयना ते बारसू पाईपलाईन टाकली जाणार आहे. ज्या गावातून आणि शहरातून ही पाईपलाईन जाणार आहे, त्याठिकाणीही नळ देण्यात येणार आहेत. या पाण्याचा वापर कसा करायचा हे संबंधित गावानं ठरवायचं आहे. पाणीपट्टीही गावाने भरयची आहे. मात्र या पाईपलाईनमुळे रिफायनरीसाठी 160 एमएलडी पाण्याची मागणी पूर्ण होईल, असे सामंत म्हणाले.

ADVERTISEMENT

इतर महत्वाचे निर्णय :

राजापूर शहर अर्जुना व खोदवली नदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे. राजापूर नगरपरिषद, नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गाळ उपसा करण्यात येणार. या माध्यमातून किमान ५ लाख कुबिक मीटर गाळ काढला जाईल. 

ADVERTISEMENT

रिफायनरी मध्ये शिवणे, देवाचे गोटने न घेण्याचा निर्णय घेतला असून सोलगाव हे गाव कायमचे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालय निर्माण करण्यात येईल. ओणी येथे उपलब्ध असणारे रुग्णालय तत्काळ सुरू करण्यात येईल. इथे लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. स्थानिकांना कौशल्यासाठी स्थानिक ठिकाणी कौशल्य केंद्र निर्माण करणार.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT