उदयनराजेंचे डोळे आले भरून; दाटलेल्या कंठाने म्हणाले, ‘यापेक्षा मेलो असतो, तर परवडलं असतं’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीवर उदयनराजे भोसले ठाम आहेत. त्यांनी पुन्हा एकदा याचा पुनर्रुच्चार केला. शिवाजी महाराजांबद्दल केल्या जात असलेल्या अवमानकारक विधानांमुळे वेदना होत असल्याचं सांगताना उदयनराजेंच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. दाटलेल्या कंठांनी उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.

ADVERTISEMENT

पुण्यात वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांनी भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसंदर्भात भूमिका मांडली.

उदयनराजे भोसले म्हणाले, ‘अनेक संघटनांचे लोक आले होते. बैठकीत साधक बाधक चर्चा झाली. जे मान्यवर आले होते, त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. आम्ही निश्चित केलेले मुद्दे आणि बैठकी मांडण्यात आलेले मुद्दे सारखेच होते.’

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला उदयनराजे म्हणाले, ‘आज स्वार्थापोटी सर्व पक्ष, मग प्रादेशिक असो की राष्ट्रीय… सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात महाराजांची प्रतिमा वा मूर्ती असते. त्यांना अभिवादन केलं जातं. त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करतो, असंच सर्वजण म्हणतात. मग अशा पार्श्वभूमीवर विकृत विधान, चित्रीकरण यातून महाराजांची अवहेलना केली जाते. त्यांच्याबद्दल गलिच्छ चित्र निर्माण केलं जातं, त्यावेळी राग कसा येत नाही. त्यांचं नाव घेता मग राग का येत नाही’, असे खडेबोल उदयनराजे भोसले यांनी राजकीय नेत्यांना सुनावले.

‘पक्ष वेगवेगळे असतील, तुमचे अजेंडे वेगवेगळे असतील, पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता. हे विकृतीकरण थांबवत नसाल, तर मग छत्रपतींचं नाव का घेता. लहान मुलांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोडका तोडका इतिहास त्यांच्यापर्यंत गेला, तर त्यांना तेच खरं वाटेल. आपण कधी या सगळ्याची दखल घेणार?’ असा सवाल उदयनराजे भोसलेंनी केला.

ADVERTISEMENT

‘राष्ट्रद्रोहाच्या कायद्यात युगपुरुषांच्या अपमानाचाही समावेश केला जावा. त्यांनी आपला विचार केला. आज आपलं कर्तव्य आहे. लोकहिताच्या विचाराची मांडणी करणार असेल, तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यमांनी करायला हवं. आपण जगात जाऊन सांगतो की, सर्वात मोठी लोकशाही आहे. अरे पण तुकडे व्हायला किती वेळ लागेल. आज सगळे व्यक्ती केंद्रीत झाले आहेत. मग प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षही यात आहे. महासत्ता होणं लांब देशाचे तुकडे पडतील. हे सगळं देशाच्या अखंडतेसाठी घातक आहे’, असंही उदयनराजे म्हणाले.

‘या लोकांना कधी कळणार आहे? पक्षाच्या प्रमुखांना. शिवाजी महाराजांचा फोटो ठेवू नका. त्यांचं विमानतळाला कशाला द्यायचं. कशाला बेगडी प्रेम दाखवायचं. शिवजयंती, शिवप्रताप दिन कशाला साजरा करायचा. हे बोलताना सुद्धा वेदना होताहेत”, असं म्हणताना उदयनराजे भोसले यांचे डोळे भरून आले. दाटून आलेल्या कंठाने उदयनराजे म्हणाले, ‘असे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो, तर परवडलं असतं. काय दिवस आले. हेच दिवस बघायचे होते. प्रत्येक ठिकाणी राजकारण करत राहिलो, तर भविष्य काय?”, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT