राजेश क्षीरसागरांना ‘मातोश्री’वर भेटीचं आमंत्रण, उद्धव ठाकरे नाराजी दूर करणार
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला नाराजीनाट्याचा सामना करावा लागतो आहे. पोटनिवडणुक लढवण्याची तयारी केलेल्या माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली. परंतू क्षीरसागर यांनी कार्यक्रमात बोलत असताना आपली नाराजी थेट बोलून दाखवली. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसू नये यासाठी राजेश क्षीरसागरांना थेट मातोश्रीवरुन आमंत्रण आलं आहे. दुपारी बारा […]
ADVERTISEMENT

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला नाराजीनाट्याचा सामना करावा लागतो आहे. पोटनिवडणुक लढवण्याची तयारी केलेल्या माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली. परंतू क्षीरसागर यांनी कार्यक्रमात बोलत असताना आपली नाराजी थेट बोलून दाखवली. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसू नये यासाठी राजेश क्षीरसागरांना थेट मातोश्रीवरुन आमंत्रण आलं आहे.
दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा करणार असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. रविवारी संध्याकाळी कोल्हापूर उत्तरमध्ये कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना क्षीरसागर यांनी माघार घ्यावी लागत असल्यामुळे नाराजी बोलून दाखवली. ज्यानंतर मातोश्रीवरुन क्षीरसागर यांना चर्चेसाठी बोलावण्यात आल्याचं कळतंय. क्षीरसागर यांच्यासोबत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेते ८-९ प्रमुख नेतेही उपस्थित असणार आहेत.
ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांच्यासाठी मतदारसंघ सोडावा लागणं दुदैवी – राजेश क्षीरसागर
राजेश क्षीरसागर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली असली तरीही पक्षाचा आदेश हा आपल्यासाठी अंतिम असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे क्षीरसागरांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. क्षीरसागर यांनी सध्या तलवार मान्य केली असली तरीही कोल्हापुरात हजारो शिवसैनिकांनी त्यांना निवडणुक लढवायला सांगितलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या या नाराजीनाट्याचा फटका आगामी लढतीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना बसण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार प्रत्यक्षात लाभ घेतंय पवार सरकार- शिवसेना खासदार गजानन किर्तीकर
