शिवसेना नक्की कोणाची?, उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी?
मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) दोन तृतीयांश आमदार उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार पडले. आता भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दावा केला आहे की, शिवसेनेचे १२ खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात असून ते उद्धव ठाकरेंच्या गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. सत्ता […]
ADVERTISEMENT
मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) दोन तृतीयांश आमदार उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार पडले. आता भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दावा केला आहे की, शिवसेनेचे १२ खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात असून ते उद्धव ठाकरेंच्या गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. सत्ता गेली आणि आता पक्षाचे अस्तित्व वाचविण्याची वेळ आली आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटाने केवळ भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले नाही, तर शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावाही शिंदे गट करत आहे. शिंदे गटही शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आपला हक्क सांगत आहे. अस्तित्वाच्या या लढाईत उद्धव ठाकरेंनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आमची बाजू जाणून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाणाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या या कृतीनंतर शिंदे गटही अॅक्शन मोडमध्ये आला असून निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडण्याची पूर्ण तयारी सुरू केली आहे.
40 आमदार म्हणजे शिवसेना नाही असा युक्तीवाद उद्धव ठाकरेंच्या गटाने केलेला आहे. शिवसेनेचा आधार हा हजारो-लाखो शिवसैनिकांचा आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने निवडणूक आयोगासमोर कॅव्हेट दाखल केले आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण किंवा निवडणूक चिन्हाबाबत आमचे मत जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेवर शिंदे गटाचा दावा आहे, त्यामुळे धनुष्यबाण किंवा निवडणूक चिन्हावर शिंदे गट दावा करू शकतो, याची उद्धव ठाकरेंना खात्री आहे. त्यामुळे खबरदारी घेत त्यांनी आधीच निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे.
हे वाचलं का?
केवळ आमदार-खासदारच नाही तर अनेक नगरसेवक, कार्यकर्ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. अशा स्थितीत पक्षातील सतत वाढत चाललेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरेंचा ताण वाढला आहे. शिवसेनेच्या प्रत्येक विभागात फूट पडली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा शिवसेनेवरील हक्काचा आधार आणखी भक्कम होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे आता तातडीने पाऊलं उचलत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या भूमिकेचे संकेत सोमवारी शिवसेना खासदारांच्या बैठकीतही दिसून आले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे मत बहुतांश खासदारांनी व्यक्त केले. शिवसेना यूपीएची सदस्य असूनही उद्धव ठाकरे एनडीएच्या उमेदवाराबाबत सकारात्मक निर्णय घेण्यास तयार असल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
दोन दिवसांत उद्धव ठाकरे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करू शकतात आणि आपल्या पक्षातील वाढती फूट रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतात. अशा प्रकारे पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला जवळ केले तर धक्का बसण्यासारखे काही नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT