नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सभागृहात झापलं; उद्धव ठाकरेंनी केलं तोंडभरून कौतुक
विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी तुम्ही मंत्री असाल, तुमच्या घरचे. हे सभागृह आहे, असं म्हणत चांगलीच तंबी दिली. विधान परिषदेतील हा प्रसंग सोशल मीडियावर चर्चिला गेला. आता यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही नीलम गोऱ्हे यांचं कौतुक करण्याचा मोह आवारला नाही. नीलम […]
ADVERTISEMENT
विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी तुम्ही मंत्री असाल, तुमच्या घरचे. हे सभागृह आहे, असं म्हणत चांगलीच तंबी दिली. विधान परिषदेतील हा प्रसंग सोशल मीडियावर चर्चिला गेला. आता यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही नीलम गोऱ्हे यांचं कौतुक करण्याचा मोह आवारला नाही.
ADVERTISEMENT
नीलम गोऱ्हे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या कार्याबद्दल भावना व्यक्त केल्या. “सर्वांना माहितीये की नीलम गोऱ्हे या आधी काही शिवसेनेच्या विचारांच्या नव्हत्या. सामाजिक कर्ता, चळवळीतील कार्यकर्ता आणि चळवळी महिला अशी त्यांची एकेकाळी ओळख होती. एके दिवशी मला निरोप आला की, नीलम गोऱ्हे यांना तुम्हाला भेटायचं. मला प्रश्न पडला की, या आपल्या विचारांच्या नाहीत. मग भेटून काय करणार? तरीही भेटलो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला शिवसेनेत यायचं आहे.
“एकही विषय असा नाही की, मी त्यांच्यावर सोपवला आणि त्यांनी अर्धवट सोडला असं झालेलं नाही. अनेकदा असं व्हायचं की मी काही सांगायच्या आधीच नीलम गोऱ्हेंचा फोन यायचा की मी तिथे पोहोचलेय आणि तिथूनच बोलतेय”, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेची सांगितली.
हे वाचलं का?
“आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. तो आहेच. पण अजूनही अशा घटना घडतात. महाराष्ट्रात तरी महिला अत्याचाराच्या घटना घडू नये. त्यात जात-पात-धर्म येता कामा नये. मग ती महिला बिलकिस बानो असो की, भंडाऱ्यातील ती पीडिता असो. सर्वच पक्षांनी अशा बाबतीत दया, माया, क्षमा नाही. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्याशिवाय या कोरड्या बोंबलण्याला अर्थ नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नीलम गोऱ्हेंचं कौतुक करताना उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मला नीलमताईंचं कौतुक वाटतं. तुम्ही कालपरवा देखील सभागृहाची उंची… सभागृहात लोकांनी कसं वागायचं… मग तो मंत्री असो की कुणीही असो. सभागृहात आल्यानंतर त्याने शिस्तीत वागलं पाहिजे, हे तुम्ही खडसावून सांगितलं याबद्द मी तुम्हाला विशेष धन्यवाद देतो. हे धन्यवाद तो कोण होता आणि तुम्ही त्याला खडसावलं म्हणून नाही. एकूणच ज्या पदावर तुम्ही बसला आहात, त्या पदाला न्याय देताना सभागृहाचं पावित्र्य कसं राखलं गेलं पाहिजे. मग ते अगदी मुख्यमंत्री असले आणि ते जर असं वागले तर कानउघाडणी करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. केलं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
“मंत्री तुम्ही तुमच्या घरी”, नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना भर सभागृहात का सुनावलं?
ADVERTISEMENT
“सभागृह हे लोकांचं आशास्थान आहे. लोकांना, समाजाला दिशा देण्याचं काम या पवित्र वास्तूत होत असतं. तुम्ही तिकडे वागताना एका मर्यादेत वागलं पाहिजे. ते भान करून देण्याचं काम तुम्ही उत्तम पद्धतीने करत आहात,” असं कौतुक उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हे यांचं केलं.
गुलाबराव पाटलांना तंबी देताना उपसभापती नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या होत्या?
‘गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली. ताकीद दिली. आधी खाली बसा लगेच. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे? परत परत सभागृहात सभापतींना हे सांगावं लागत आहे. तुम्ही चौकात उभे आहात का?’ असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले ‘मी मंत्री आहे.’ त्यावर लगेच नीलम गोऱ्हे म्हणाल्या ‘मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा’, अशा शब्दात सुनावलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT