Shiv Sena ची स्थापना निवडणूक आयोगाच्या नाही, माझ्या वडिलांनी केली : ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खेड : हा चुना लगाओ आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. वरुन जे आदेश येतात, त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त (Election Commissionor) म्हणून राहण्याच्या लायकीचे नाहीत. हे मी उघडपणे बोलत आहे. याच कारण असं की त्यांनी ज्या तत्वावरती शिवसेना त्यांची असं सांगितलं आहे, हे तत्वच मुळात छूट आहे. शिवसेनेची (Shiv sena) स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी केलेली नाही, माझ्या वडिलांनी केलेली आहे, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयुक्तांच्या निर्णयावर घणाघाती टीका केली. (Uddhav thackeray talking about shivsena and election commission of india)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांचा आज (रविवारी) खेडमध्ये ‘शिवगर्जना मेळावा’ पार पडला. यावेळी माजी आमदार संजय कदम यांचा पक्षप्रवेशही पार पडला. याच मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

ज्यांना जे जे देणं शक्य होतं ते त्यांना दिलं. पण तरीही ते खोक्यात बंद झाले. आता माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाही. तरीही तुम्ही माझ्यासोबत आहात. आता मी तुमच्याकडे मागणार आहे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. जे भुरटे आहेत, जे चोर आहात, गद्दार आहेत, तोतया आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल. पण शिवसेना नाव नाही चोरु शकणार, धनुष्यबाण चोरला असेल. पण तो तुम्हाला पेलवेल असं नाही. रावण उताना पडला तिथं शिंदे काय परत उभे राहणार.

हे वाचलं का?

Uddhav Thackeray LIVE : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवगर्जना

मला निवडणूक आयोगाला सांगायचं आहे की तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर कोणती शिवसेना हे पाहायला या. हा चुना लगाओ आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत .हे निवडणूक आयुक्त म्हणून राहण्याच्या लायकीचे नाहीत. हे मी उघडपणे बोलत आहे. याच कारण असं की त्यांनी ज्या तत्वावरती शिवसेना त्यांची असं सांगितलं आहे, हे तत्वच मुळात छूट आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी केलेली नाही, माझ्या वडिलांनी केलेली आहे.

ADVERTISEMENT

बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय?

यात अनेक जण असे आहेत, त्यांनी बाळासाहेबांना प्रत्यक्ष बघितलं नाही ते मला बाळासाहेबांचे विचार शिकवतं आहेत. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे येत होते. आता गद्दारांनी उद्योग बाहेर जाऊ देणं, नोकऱ्या बाहेर जाऊ देणं हे केलं. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. भूमिपुत्रांसाठी लढणारे हे बाळासाहेबांचे विचार होते.

ADVERTISEMENT

मी मुख्यमंत्री असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची हिंमत होत नव्हती. ती आता झाली. हे शेपट्या घालून बसले. कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की हे शेपट्या घालून बसतात, हे बाळासाहेबांचे विचार. एक काळी टोपी घालणार होते ते गेले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, तरीही हे शेपट्या बाहेरच येत नाहीत. दिल्लीसमोर शेपट्या घालून बसणं हे बाळासाहेबांचे विचार नव्हते.

‘बाम लाव्याने ठाण्याच्या वेड्याच्या…’, भास्कर जाधवांची कदमांवर टीका

एसटीच्या जाहिरातीवर ठाकरेंची सडकून टीका :

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ज्या जाहिरातीवरुन शिंदे सरकारवर टीका केली, त्याच एसटीच्या जाहिरातीवरुन उद्धव ठाकरे यांनीही शिंदेंवर टीका केली. ते म्हणाले, तुटलेल्या फुटलेल्या एसटीच्या काचांवर गतीमान महाराष्ट्र अशी जाहिरात लावायची. त्या एसटी महामंडळाचे काय हाल आहेत हे आम्हाला माहित आहे. आतमध्ये सुविधा नाही, पण त्यावर आपला हसणारा फोटो लावयला लाज वाटत नाही का? असा सवाल ठाकरेंनी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT