मंत्रालयात दोन शिफ्टचे नियोजन करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे निर्देश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्टचं नियोजन कशा रितीने करता येईल? आणि वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल त्याचे नियोजन तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्य सचिवांना दिल्या. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन वेळांची १० ते ५ ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीतही सुचवले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्राने नव्या संस्कृतीची सुरूवात करावी असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरूवात करून पाहू, ज्यामध्ये कामंही संपूर्ण क्षमतेने आणि व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी असेल. अधिकारी महासंघाने यामध्ये पुढाकार घ्यावा तसेच सगळ्यांना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे असंही मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे.

हे वाचलं का?

आज घडीला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे असं दिसतं आहे. त्यामुळे मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन म्हणून प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना आज देण्यात आले.

ADVERTISEMENT

मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणे करून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT