उद्धव ठाकरेंच्या विभागप्रमुखांना सूचना, बैठकीत बंडखोर आमदारांचा शब्दही नाही काढला
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल वर्षावरुन आपला मुक्काम मातोश्रीवरती हालवला. उद्धव ठाकरें मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशा चर्चा होत असतानाच उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यात पक्षप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. पक्षाचा विस्तार करून पक्ष तळागाळात बळकट करण्यावर भर द्या […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल वर्षावरुन आपला मुक्काम मातोश्रीवरती हालवला. उद्धव ठाकरें मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशा चर्चा होत असतानाच उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यात पक्षप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
पक्षाचा विस्तार करून पक्ष तळागाळात बळकट करण्यावर भर द्या असा महत्त्वाचा आदेश मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांचे एकदाही नाव घेतले नाही. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलणे टाळायला सांगितले आहे. शिवसेनेची मुळ ताकद ही प्रभाग स्तरावरील कार्यकर्ता आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता तिच ताकद बळकट करण्याकडे पहिले पाऊल टाकले आहे.
“उद्धव ठाकरे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत…” शरद पवारांनी स्पष्ट केली महाविकास आघाडीची भूमिका
हे वाचलं का?
काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकीय घडामोडीवरती भाष्य केले. जर बंड केलेल्या आमदारांची इच्छा असेल तर मी आज मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. फक्त मुख्यमंत्री पदच नाहीतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख पद देखील मी सोडतो, फक्त हे मला समोर येऊन सांगा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी आपले शासकीय निवासस्थान सोडले आणि वर्षाकडे रवाना झाले.
शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार आपल्यासोबत आहे असा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. आपले ८० टक्के आमदार फुटल्याने उद्धव ठाकरे कुठेतरी बॅकफुटवर जातील असे वाटले होते. परंतु उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे पक्षवाढीवरही लक्ष देतील यात शंका नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT