संजय राठोडांच्या राजीनाम्यावर ठाकरे निर्णय घेणार? सेनेची आज बैठक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. २२ वर्षांची टीकटॉक स्टार पुजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमध्ये संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. अवश्य वाचा – यवतमाळमध्ये […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. २२ वर्षांची टीकटॉक स्टार पुजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमध्ये संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत.
ADVERTISEMENT
अवश्य वाचा – यवतमाळमध्ये पुणे पोलिसांचं पथक, पूजा चव्हाण प्रकरणी तपास करणार
राज्यात विरोधीपक्ष असलेल्या भाजपने याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले असून पोलिसांनी ऑडीओ क्लिपची चौकशी करावी अशी मागणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी केली होती. संजय राठोड गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीयेत. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या आजच्या बैठकीत याप्रकरणी काही निर्णय घेतला जातो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष असे सर्व महत्वाचे नेते बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. याचसोबत आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात रणनिती आखली जाण्याची शक्यताही आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात कार्यक्रमासाठी आलेल्या अमित शहा यांनी थेट शिवसेनेवर आरोप केले होते. आम्ही तुमच्यासारखं राजकारण केलं असतं तर तुमचं अस्तित्व राहिलं नसतं या अमित शहांच्या आरोपांनाही उद्धव ठाकरे काही उत्तर देणार का हे पहावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT