सुषमा स्वराज, अरुण जेटलींचा मृत्यू मोदींच्या टॉर्चरमुळे ! उदयनिधी स्टॅलिन यांचं वादग्रस्त विधान
तामिळनाडूमधील DMK पक्षाचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याच्या वादग्रस्त विधानावरुन सध्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचा मृत्यू नरेंद्र मोदींच्या टॉर्चरमुळे झाल्याचं उदयनिधीने म्हटलं. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रचारसभेत बोलत असताना उदयनिधी यांनी पंतप्रदान मोदींवर टीका करताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “सुषमा स्वराज […]
ADVERTISEMENT

तामिळनाडूमधील DMK पक्षाचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याच्या वादग्रस्त विधानावरुन सध्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचा मृत्यू नरेंद्र मोदींच्या टॉर्चरमुळे झाल्याचं उदयनिधीने म्हटलं. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रचारसभेत बोलत असताना उदयनिधी यांनी पंतप्रदान मोदींवर टीका करताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
“सुषमा स्वराज नावाच्या एक व्यक्ती होत्या. मोदींनी त्यांच्यावर प्रेशर टाकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटलींचा मृत्यूही मोदींच्या टॉर्चरमुळे झाला.” भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक ज्येष्ठ नेत्यांना आपल्या वाटेतून दूर केलं. ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांचाही यात समावेश आहे असंही उदयनिधी आपल्या भाषणात म्हणाले.
“मिस्टर मोदी, तुम्ही या सर्वांना बाजूला केलंत. पण तुम्हाला घाबरायला किंवा तुमच्यासमोर झुकायला मी काही इ. पलानीस्वामी नाहीये. माझं नाव उदयनिधी स्टॅलिन आहे, मी करुणानिधींचा नातू आहे”, अशा शब्दांमध्ये उदयनिधींनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली.
उदयनिधी यांच्या टीकेला उत्तर देताना सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या मुलींनी सडेतोड प्रत्युत्तर देत राजकीय फायद्यासाठी आमच्या पालकांच्या मृत्यूचं भांडवल करु नका असा सल्ला दिला आहे.