रशिया विरोधातील प्रस्तावावर भारताने मतदान का केलं नाही?; अमेरिका, रशिया काय म्हणाले?
संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या सुरक्षा परिषदेत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांच्या निषेधाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर भारत काय भूमिका घेतो, याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मात्र, भारताने या प्रस्तावावरील मतदान प्रक्रियेतच भाग घेतला नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्री संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत रशियाने केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ प्रस्ताव मांडण्यात आला […]
ADVERTISEMENT

संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या सुरक्षा परिषदेत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांच्या निषेधाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर भारत काय भूमिका घेतो, याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मात्र, भारताने या प्रस्तावावरील मतदान प्रक्रियेतच भाग घेतला नाही.
भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्री संयुक्त राष्ट्रे संघटनेच्या सुरक्षा परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत रशियाने केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर 15 देशांना मतदान करायचं होतं. मात्र, भारताने मतदान न करण्याचा निर्णय घेतला.
Russia-Ukraine war : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना फोन
11 देशांनी प्रस्तावाला समर्थन दिलं, तर भारतासह चीन आणि युएईने मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असल्याने रशियाने ‘व्हेटो’ अधिकारांचा वापर करत प्रस्ताव रोखला. सुरक्षा परिषदेतील पाच सदस्य देशांकडेच ‘व्हेटो’ अधिकार आहे. रशियाबरोबर अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनला ‘व्हेटो’ वापरण्याचा अधिकार आहे.










