लग्नासाठी मुलगी मिळेना, तरुणाचा थेट आमदाराला फोन; वाचा पुढे काय घडलं
इसरार चिश्ती, प्रतिनिधी (औरंगाबाद) Aurngabad MLA and Youth audio clip viral: औरंगाबाद: लग्न (Marraige) जुळत नसलं तर मित्र परिवाराला, नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना मुलगी आहे का? असा प्रश्न अनेक जण विचारतात. मात्र खुलताबाद तालुक्यातील एका तरुणाने चक्क कन्नडचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे (Shiv Sena) आमदार उदयसिंह राजपूत यांनी फोन करत मुलगी पाहण्याची विनंती केली आहे. […]
ADVERTISEMENT
इसरार चिश्ती, प्रतिनिधी (औरंगाबाद)
ADVERTISEMENT
Aurngabad MLA and Youth audio clip viral: औरंगाबाद: लग्न (Marraige) जुळत नसलं तर मित्र परिवाराला, नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना मुलगी आहे का? असा प्रश्न अनेक जण विचारतात. मात्र खुलताबाद तालुक्यातील एका तरुणाने चक्क कन्नडचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे (Shiv Sena) आमदार उदयसिंह राजपूत यांनी फोन करत मुलगी पाहण्याची विनंती केली आहे. याची आता ऑडिओ क्लिप (Audio Clip) प्रचंड व्हायरल झाली असून औरंगबादमध्ये हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. (unable to get a girl for marriage young man calls mla directly know what happened next)
‘तुमच्या तालुक्यात जास्त मुली, बघा काही होतं का’
चांगलं शिक्षण, नोकरी असूनही अनेक तरुण मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही. त्यात शेतकरी नवरा नको ग बाई अशी अनेक मुलींची इच्छा असते. त्यामुळे अनेक युवक चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत असूनही लग्न जुळत नसल्याने त्रस्त आहेत. त्यामुळेच खुलताबाद तालुक्यातील एका युवकाने चक्क कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनाच मुलगी पाहण्याची विनंती केली.
हे वाचलं का?
Solapur: लग्न जमत नसल्यानं बाशिंग बांधून तरुणांचा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा
‘आमदार साहेब, मी खुलताबाद तालुक्यातील ग्रामीणमधून बोलतोय. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आठ-नऊ एकर जमीन आहे. तरीही इकडे मुली देत नाहीत. तुमच्या तालुक्यात खूप मुली आहे, एखादे स्थळ बघा.’
अशी मागणी आमदार उदयसिंग राजपूत यांच्याकडे एका तरूणाने फोनवरून केली. त्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
ADVERTISEMENT
समाजात अनेक युवकांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत हे काही नवीन नाही. ग्रामीण भागात ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक तरुणी या शहरी भागातील मुलांना लग्नासाठी प्राधान्य देतात. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण अविवाहित राहण्याचं प्रमाण वाढलं आहे.
ADVERTISEMENT
इंजिनिअर बहिणींनी एकाच मुलासोबत केलं लग्न, कारण ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल
आतापर्यंत जे तरुण आमदारांकडे आपल्या गावाच्या विविध समस्यांसाठी युवक संपर्क साधायचे. तेच तरुण आता चक्क विवाहासाठी मुलगी शोधण्याची मागणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुले हा विषय अधिक चर्चेत आला आहे.
आमदार राजपूत यांना तालुक्यातून आमच्या गावात रस्ते करा, पाण्याची सोय करा आदी विविध कामासाठी मतदार आणि नागरिकांचे फोन येत असतात. मात्र दुसऱ्या तालुक्यातील तरुणाने थेट फोनवर ‘तुमच्या तालुक्यात खूप मुली आहेत. साहेब, एखादे स्थळ बघा.’ अशी मागणी करण्यात आली. त्यावर काय उत्तर द्यावं हे बहुदा आमदार महोदयांना कळलं नसावं, म्हणूनच आमदार राजपूत यांनी ‘तुझा बायोडाटा पाठवून दे… मी बघतो’ असं म्हणत तरुणाचे समाधान केले आहे.
मात्र, ग्रामीण भागातील ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने येथील तरुणांची वैवाहिक जीवन कसे असेल याबाबतची चिंताही वाढली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT