भुजबळांविरुद्ध कोर्टातला अर्ज मागे घेण्यासाठी छोटा राजन टोळीचा फोन – आमदार सुहास कांदेंचा तक्रार अर्ज
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील DPDC च्या निधी वाटपाचा वाद आता कोर्टातून थेट अंडरवर्ल्ड पर्यंत पोहचला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात कोर्टात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या माणसांनी धमकावल्याची तक्रार आमदार कांदे यांनी नाशिक पोलिसांत केली आहे. DPDC निधी गैरव्यवहार प्रकरणी कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात मुंबई […]
ADVERTISEMENT
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील DPDC च्या निधी वाटपाचा वाद आता कोर्टातून थेट अंडरवर्ल्ड पर्यंत पोहचला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात कोर्टात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या माणसांनी धमकावल्याची तक्रार आमदार कांदे यांनी नाशिक पोलिसांत केली आहे.
ADVERTISEMENT
DPDC निधी गैरव्यवहार प्रकरणी कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. मात्र यावरुन सुरु झालेला वाद आता वेगळ्या दिशेने जात आहे.पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार हा खटला मागे घ्यावा यासाठी छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे याने आमदार कांदेंना फोन केला होता. “हा खटला मागे घ्या, अन्यथा आमच्याशी गाठ आहे”, अशी धमकी दिल्याची तक्रार आमदार कांदेंनी नाशिक पोलिसांना केली असून ज्या नंबरवरुन आपल्याला धमकीचा फोन आला तो नंबरही कांदे यांनी पोलिसांना दिला आहे.
Chhagan Bhujbal यांच्याविरोधात शिवसेना आमदार सुहास कांदेंची कोर्टात धाव, केला गंभीर आरोप
हे वाचलं का?
आमदार कांदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या कार्यालयातून ते बाहेरगावी असल्याचे सांगितले गेले. मात्र याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र दिले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रीया आलेली नाही. मात्र एकंदरच नांदगाव मतदारसंघातील हे प्रकरण आता अधिक चिघळत आहे, यामागे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद की सुहास कांदे यांची अपरिहार्यता आहे हे लवकरच समजेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT