महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे- नारायण राणे
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. बेबंदशाही चालली आहे. जे सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहत. पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड घेत आहेत. राज्यात खून होत आहेत, दरोडे पडत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकुश राहिलेला नाही. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. बेबंदशाही चालली आहे. जे सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालत आहत. पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड घेत आहेत. राज्यात खून होत आहेत, दरोडे पडत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकुश राहिलेला नाही. नवनीत राणा या खासदार आहेत तर रवी राणा हे आमदार आहेत. मुख्यमंत्री सक्षम आहेत का? त्यांना राज्याचे प्रश्न माहित नाहीत. त्यांचं शेवटचं भाषण अंतिम आठवडा प्रस्तावावार झालं. पण हे भाषण कलानगरच्या नाक्यावरच्या भाषणासारखं होतं. त्यांनी महाराष्ट्राला दहा वर्ष मागे नेले आहे. 89 हजार कोटी तूट असून राज्याची व्यवस्था पूर्ण बिघडली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले नाहित तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू असे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर येऊन हनुमान चालिसाचे पठण करणार असे आव्हान दिले होते. त्यानुसार राणा दाम्पत्य शुक्रवारी मुंबईत आले.
नवनीत राणा या खासदार आहेत, त्यांचे पती आमदार आहेत. त्यांना जी वागणूक दिली जाते आहे ती योग्य नाही. सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली. त्यावेळी तिथे एक मंत्री उपस्थित होता. तसंच दिशा सालियनवर अत्याचार केले आणि हत्या केली त्यावेळीही मंत्री होता. ही परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. मुख्यमंत्री सक्षम नाहीत का? परिस्थिती हाताळण्यात? असं विचारण्यात आल्यानंतर नारायण राणे म्हणाले की ते कधी सक्षम होते? प्रशासन, राज्याचे प्रश्न काहीही त्यांना माहित नाही. कॅबिनेटला बसत नाहीत. सभा घेत नाहीत. त्यांना कारभार कसा चालतो माहित नाही असाही आरोप नारायण राणेंनी केला.