उत्तरप्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर, ATS ने केला रॅकेटचा पर्दाफाश; दोन मौलवी अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तरप्रदेशात हजारो मुलं आणि महिलांचं धर्मांतर करणारं रॅकेट ATS ने उघड केलं आहे. याप्रकरणी एटीएसने दोन मौलानांना अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून धर्मांतराचं हे रॅकेट सुरू होतं. मूक बधिर मुलं आणि महिलांचं धर्मपरिवर्तन केलं जात होतं. यासाठी विदेशी फंडिंग होत होतं अशीही बाब समोर आली आहे. त्याचे पुरावेही ATS कडे आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणी फक्त दोघांना अटक झाली आहे. मात्र प्रत्यक्षात या रॅकेटमध्ये 100 पेक्षा जास्त लोक सहभागी आहेत असा संशय ATS ला आहे.

ADVERTISEMENT

उत्तरप्रदेश पोलिसात कायदा आणि सुव्यस्था विभागाचे ADG प्रशांत कुमार यांनी सांगितलं की एक वर्षात 350 पेक्षा जास्त जणांचं धर्मांतर करण्यात आलं. नोएडा येथील एका मूक बधिर शाळेतल्याही 18 मुलांचं धर्मांतरण करण्यात आलं. आत्तापर्यंत एक हजारपेक्षा जास्त लोकांचं धर्मांतरण करण्यात आलं आहे. हे लोक लोकांना धमक्या देऊन किंवा आमीष दाखवून त्यांचं धर्मांतर करतात असंही प्रशांत कुमार यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काजी जहांगीर कासमी या दोन मौलानांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही मौलाना दिल्लीच्या जामिया नगर भागातले आहेत. त्यांच्यावर फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात धर्मांतरण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी ATS ने गोमती नगर पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. या दोन्ही मौलानांची गेल्या चार दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे.

हे वाचलं का?

ATS ने जी FIR दाखल केली आहे त्यानुसार हे लोक मुस्लिम नसलेल्या लोकांना घाबरवून, धमक्या देऊन, त्यांना नोकरीचं किंवा पैशांचं आमीष दाखवून त्यांचं धर्मांतर करत होते. गरीब घरातले लोक, महिला आणि मूक बधिर मुलांचं या रॅकेटमध्ये जबरदस्तीने धर्मांतर केलं जात होतं. गरीब हिंदूंना हेरून त्यांचं धर्मांतर केलं जात असे असंही ATS ने म्हटलं आहे.

पोलिसांनी दोघांची चौकशी केली. वर्षभरात २५० ते ३०० मुलांचं धर्मांतर केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांना पैसे आणि नोकरीचं आमिष देऊन हे धर्मांतर करत होते. कल्याणपूर आणि कानपूर येथील दाम्पत्यांच्या मूकबधिर मुलाचं धर्मांतर करण्यात आलं. त्यानंतर त्याला दक्षिण भारतात पाठण्यात आलं. अशी हजारो प्रकरण समोर आली आहेत, असं प्रशांत कुमार म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT