Maulana Kaleem Siddiqui यांना अटक भारतात सर्वात मोठं धर्मांतर सिंडिकेट चालवल्याचा ATS चा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बेकायदा धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसने ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक केली आहे. मेरठ या ठिकाणाहून मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक करण्यात आली आहे. मौलाना कलीम सिद्दीकी हे जमीयत-ए-वलीउल्लाहचेही अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कलीम सिद्दीकी यांची लिंक मुफ्ती काजी आणि उमर गौतम यांच्याशीही आहे. धर्मांतरण प्रकरणातच या दोघांनाही अटक झाली आहे.

देशातलं सर्वात मोठं धर्मांतरणाचं सिडिंकेट चालवल्याचा गंभीर आरोप मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर आहे. शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि धार्मिक संस्थांच्या आडून बेकायदा धर्मांतरण करण्यात मौलाना कलीम सिद्दीकी यांचा मोठा वाटा आहे. देशपातळीवर ते हे काम करत होते असं यूपी एटीएसने म्हटलंय. त्यांना विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता असंही एटीएसने स्पष्ट केलं आहे.

यूपी एटीएसने हा दावा केला आहे की भारतातील सगळ्यात मोठं धर्मांतरण सिंडिकेट चालवण्यात मौलाना कलीम यांचा हात होता. मुस्लिम नसणाऱ्यांची ते दिशाभूल करत होते आणि त्यांचं बेकायदा धर्मांतरण करत होते. आपली ट्रस्ट चालवण्यासोबतच ते तमाम मदरशांना फंडिंगही करत होते. त्यांना येणाऱा निधी हा हवाला मार्फत किंवा अन्य बेकायदेशीर मार्गाने पाठवला जात होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर हा आरोपही आहे की मदरशांच्या आडून लोकांना माणुसकी जपण्याच्या संदेश देण्याच्या नावाखाली लोकांना जन्नत (स्वर्ग) आणि जहन्नुम (नरक) यांसारख्या गोष्टींची भीती दाखवून किंवा आमिष दाखवून इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रेरित करत होते. त्यानंतर या लोकांना प्रशिक्षित करून इतर लोकांचं धर्मांतरण अशाच प्रकारे करण्याचा प्रयत्न करत होते.

यूपी एटीएसने हा दावाही केला आहे की उमर गौतम यांच्याशी संबंधित असलेली अल-हसन एज्युकेशन अँड वेलफेअर फाऊंडेशन यांनाही कलीम यांनीच फंडिग केलं होतं. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत कलीम यांनी 3 कोटींचं फंडिंग केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने हा दावाही केला आहे की उमर गौतम आणि त्यांच्या साथीदारांना ब्रिटनच्या अल-फला ट्रस्टकडून साधारण 57 कोटींचं फंडिंग करण्यात आलं आहे. हे पैसे नेमके कुठे खर्च केले याचा हिशोब अटक केलेल्यांपैकी कुणीही देऊ शकलेलं नाही असंही एटीएसने म्हटलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT