मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाण्याच्या राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमिल शेख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या इरफान उर्फ सोनु शेख मनसुर याला लखनऊच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली आहे. २३ नोव्हेंबर २०२० रोजी मनसेचे पदाधिकारी जमिल शेख यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारात सोनुने जमिल शेख यांच्या थेट डोक्यात गोळी घालून त्यांची हत्या केली. या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पहिला आरोपी शाहिद शेख याला अटक केली होती, परंतू गोळी झाडणारा सोनु हा या प्रकरणानंतर फरार झाला होता.

ADVERTISEMENT

जमिल शेख हे मनसेचे पदाधिकारी होते, याव्यतिरीक्त ते माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून परिचीत होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी इरफानला अटक केल्यानंतर जमिनीच्या वादातून जमिल यांच्या हत्येसाठी २ लाखांची सुपारी देण्यात आली होती अशी माहिती दिली. घटनास्थळावरुन फरार झालेला इरफान उत्तर प्रदेशात असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून आरोपीला पकडण्यासंदर्भात मदत मागितली. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या एका पथकाने ३ एप्रिल रोजी लखनऊच्या कठोता परिसरात कारवाई करत इरफानला अटक केली आहे.

जमिल यांच्या हत्येसाठी १० लाख रुपयांची सुपारी ठरवली होती, ज्यातील २ लाख रुपये अडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. दरम्यान जमिल यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये. लखनऊ न्यायालयातून ठाणे पोलिसांचं एक पथक इरफानचा ताबा घेणार आहे. सोमवारी इरफानला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यानंतरच्या चौकशीच या जमिल यांच्या हत्याप्रकरणात कोणाचा सहभाग होता याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT