देशात 2023मध्ये होणार वंदे मेट्रो रेल्वे आणि पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वेची सुरुवात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वे एकापाठोपाठ एक अनेक डेव्हलोपमेंट करत आहे. रेल्वे वंदे मेट्रो ट्रेन बनवत आहे, जी 1950 आणि 60 च्या दशकात डिझाइन केलेल्या रेल्वेची जागा घेईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 18 डिसेंबर (रविवार) ही माहिती दिली. ते म्हणाले की, पहिली स्वदेशी डिझाइन आणि उत्पादित हायड्रोजन ट्रेन डिसेंबर 2023 मध्ये सुरू होईल.

ADVERTISEMENT

आम्ही वंदे मेट्रो ट्रेनचे डिझाईन तयार करत असून मे किंवा जूनपर्यंत डिझाईन तयार होईल असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. आम्ही जागतिक दर्जाच्या वंदे मेट्रोची रचना करत आहोत, जे एक मोठे यश असेल. ते म्हणाले की या वंदे मेट्रो गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातील की 1950 आणि 1960 च्या दशकात डिझाइन केलेल्या गाड्या देशभरात बदलल्या जातील, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, वंदे मेट्रो मध्यमवर्गीय आणि गरिबांना डोळ्यासमोर ठेवून उभारण्यात येत आहे. त्यांचे लक्ष श्रीमंत ग्राहकांवर नाही. श्रीमंत लोक स्वतःची काळजी घेऊ शकतात, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारचे विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांवर आहे. रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, रेल्वेने प्रत्येक भारतीयाच्या जीवनात मोठा परिवर्तन घडवून आणावा अशी पंतप्रधानांची इच्छा आहे.

हे वाचलं का?

रेल्वेच्या खासगीकरणावर काय म्हणाले रेल्वेमंत्री?

त्याचवेळी, हायड्रोजनवर आधारित ट्रेनच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, वंदे भारतप्रमाणेच भारतीय अभियंते त्याची रचना करत आहेत. ते पुढे म्हणाले की डिझाइनची प्रक्रिया आधीच सुरू आहे आणि आम्ही डिसेंबर 2023 पर्यंत देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू करू शकू. त्याचवेळी रेल्वेच्या खासगीकरणावर बोलताना वैष्णव म्हणाले की, रेल्वे हे धोरणात्मक क्षेत्र असून ते सरकारकडेच राहील.

वंदे भारत-3 चा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी

देशात धावणाऱ्या वंदे भारत गाड्या प्रवाशांसाठी अधिक चांगल्या बनवण्यासाठी त्यात स्लीपर क्लास जोडले जाणार आहेत. रेल्वे मंत्री म्हणाले की, रेल्वे वंदे भारत-3 च्या डिझाइनवर काम करत आहे, ज्यामध्ये स्लीपर क्लास देखील असेल. वंदे भारत-3 चा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी करता येईल.

ADVERTISEMENT

मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरचं काय?

याशिवाय मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरबाबत बोलताना रेल्वेमंत्री म्हणाले की, त्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वेमंत्री म्हणाले की, बुलेट ट्रेन ऑपरेशनचे तंत्रज्ञान गुंतागुंतीचे आहे, परंतु भारतीय अभियंत्यांनी या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आहे. ते म्हणाले की, मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, रेल्वे देशात आणखी 11 किंवा 12 कॉरिडॉर बांधण्याचे काम करेल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT