वसई: 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या जवानाचा संशयास्पदरित्या मृत्यू, रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह
वसई: भारतीय लष्करात असलेल्या एका 26 वर्षीय जवानाचा मृतदेह संशयास्पदरित्या रेल्वे रुळावर आढळून आला आहे. मीरारोड ते दहिसरदरम्यान हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जवानाचं नाव भूपेंद्र सिंह टोकस असं आहे. जो गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होता. भूपेंद्र सिंह टोकस हे मुंबईमधून चार दिवसांपूर्वीच अचानक गायब झाले होते. ज्याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रारही […]
ADVERTISEMENT

वसई: भारतीय लष्करात असलेल्या एका 26 वर्षीय जवानाचा मृतदेह संशयास्पदरित्या रेल्वे रुळावर आढळून आला आहे. मीरारोड ते दहिसरदरम्यान हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जवानाचं नाव भूपेंद्र सिंह टोकस असं आहे. जो गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होता.
भूपेंद्र सिंह टोकस हे मुंबईमधून चार दिवसांपूर्वीच अचानक गायब झाले होते. ज्याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली होती. दरम्यान, आता रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा तपास आता वसई लोहमार्ग पोलीस करत आहेत.
वांद्रे-गाझीपूर एक्सप्रेसच्या धडकेत भूपेंद्र सिंह टोकस यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. भूपेंद्र सिंह टोकस हे लष्करात लुधियाना युनिट इथे कार्यरत होते. सेवा अंतर्गत कोर्स करण्याकरिता ते मुंबईत आले होते. ज्यानंतर ही गंभीर घटन घडली.
तब्बल 4 दिवस बेपत्ता असलेल्या भूपेंद्र सिंह टोकस यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडणं हे संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचे आहे की, वसई लोहमार्ग पोलीस व कफ परेड पोलीस कशाप्रकारे भूपेंद्र सिंह टोकस यांच्या मृत्यूचा छडा लावतात.










