वेदांताला लिहिलेलं ‘ते’ पत्र आदित्य ठाकरेंच्या हाती; CM शिंदेंना दिलं खुलं आव्हान!
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्द्यांवरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मंगळवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर घालविल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी एमआयडीसीने वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना 5 सप्टेंबर 2022 रोजी सामंजस्य करारासाठी दिलेल्या निमंत्रणाचं एक पत्रही वाचून दाखविलं. जर सामंजस्य करारासाठी एखाद्या कंपनीला निमंत्रण दिलं […]
ADVERTISEMENT

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्द्यांवरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मंगळवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर घालविल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी एमआयडीसीने वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना 5 सप्टेंबर 2022 रोजी सामंजस्य करारासाठी दिलेल्या निमंत्रणाचं एक पत्रही वाचून दाखविलं.
जर सामंजस्य करारासाठी एखाद्या कंपनीला निमंत्रण दिलं जातं याचा अर्थ प्राथमिक टप्प्यातील सर्व बोलणी झालेली असते, सर्व अटी-शर्ती ठरलेल्या असतात. केवळं कागदोपत्री प्रक्रिया होणे बाकी असते. मग अशावेळी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेलाच कसा असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला. सोबतच यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्याच्या बाहेर गेलेल्या प्रकल्पांवरुन जाहीर चर्चेला येण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना खुलं आव्हान दिलं.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आता गुजरातमध्ये गेला. प्रकल्प गुजरातमध्ये गेला त्याचं वाईट वाटत नाही. मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो युवकांचा लोकांचा रोजगार गेला, आणि त्याबद्दल कोणीच बोलत नाही. हा प्रकल्प आमच्यामुळे गेला असा आरोप झाला. महाविकास आघाडीच्या काळात यावर काहीच कार्यवाही झाली नाही, असा आरोप झाला. यावर आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. त्याला आता दीड महिन्यांनी उत्तर आलं आहे.
5 सप्टेंबर 2022 रोजी एमआयडीसीच्या वतीने वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना सामंजस्य करार सही करण्यासाठी एका पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आलं होतं. मी यापूर्वीही हा पत्रव्यवहार झाल्याचं सांगतं होतो. पण तेव्हा ते पत्र आमच्या हातात नव्हतं. खोके सरकारमध्ये बसलेल्या आमच्याच लोकांनी मला याबाबत माहिती दिली होती.