Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचे ‘हे’ चित्रपट कायम राहतील आठवणीत, तुम्ही बघितले आहेत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखलेंनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं होतं. रंगभूमीवरील नावाजलेले कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. पण, त्यांचे असे काही चित्रपट आहेत, जे त्यांच्या निधनानंतरही आपल्याला कायम लक्षात राहतील…

ADVERTISEMENT

विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान मोठं आहे. 1989 मध्ये आलेल्या सुखी जोडप्याच्या आयुष्यावर आधारित कळत नकळत हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. मनोहर असं त्यांच्या व्यक्तीरेखेचं नाव होतं.

गोखलेंचं मराठी प्रमाणेचं हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव होतं. त्यांनी १९७१ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या परवाना चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, ‘बॅरिस्टर’ अजरामर करणाऱ्या अभिनेत्याची एक्झिट

९० च्या दशकातला संजय लीला भन्साळी यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट चांगलाच गाजला. यामध्ये त्यांनी ऐश्वर्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ते शास्त्रीय गायक होते.

ADVERTISEMENT

गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या अनुमती सिनेमातही रीमा लागू, नीना कुलकर्णी आणि सुबोध भावे यांसारख्या कलाकारांसोबत रत्नाकर म्हणून भूमिका साकारली. या चित्रपटासाठी त्यांना न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.

ADVERTISEMENT

राजकारणातील हेवेदावे आणि भ्रष्टाचारावर आधारित वजीर हा विक्रम गोखलेंचा सिनेमाही चांगलाच गाजला होता. पुरूषोत्तम ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती.

अग्निपथ सिनेमातही त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या तोडीसतोड पोलिस कमिशनरची भूमिका साकारली होती.

एव्हरग्रीन माहेरची साडी सिनेमातील विक्रम गोखलेंची भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. त्यांनी माहेरची साडी या सिनेमात अलका कुबल यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

अलीकडच्या काळातला नटसम्राट चित्रपटातही त्यांनी नाना पाटेकर म्हणजे आप्पाच्या मित्र रामभाऊची भूमिका साकारली होती. यामध्ये नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

‘देहबोली, डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचं कसब असलेला भारदस्त अभिनेता!’ विक्रम गोखलेंच्या निधनानं राजकारणीही भावूक

याशिवाय, विक्रम यांनी भूल भुलैया, मिशन मंगल, हिचकी, निकम, अग्निपथ, विक्रम बेताल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत, ज्या आपल्याला कायम लक्षात राहतील. विक्रम गोखलेंचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वाधिक आवडला होता? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT