Veena Kapoor म्हणाल्या मी जिवंत! मला माझ्या मुलाने ठार केलं नाही..

मुंबई तक

अभिनेत्री वीणा कपूर यांना त्यांच्या मुलाने ठेचून मारल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता वीणा कपूर यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. वीणा कपूर या जिवंत आहेत. वीणा कपूर यांचा खून झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. ज्यानंतर आता त्या समोर आल्या आहेत. त्यामुळे मृत्यू कुणाचा झाला? हा प्रश्नही उपस्थित होतो […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेत्री वीणा कपूर यांना त्यांच्या मुलाने ठेचून मारल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता वीणा कपूर यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. वीणा कपूर या जिवंत आहेत. वीणा कपूर यांचा खून झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. ज्यानंतर आता त्या समोर आल्या आहेत. त्यामुळे मृत्यू कुणाचा झाला? हा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

वीणा कपूर यांच्या मृत्यूबाबत गोंधळ

मुंबईतल्या जुहू भागात अभिनेत्री वीणा कपूर यांचं घर आहे. त्यांचा खून करण्यात आल्याची तो खून त्यांच्या मुलानेच केल्याची बातमी समोर आली आहे. वीणा कपूर या जिवंत आहेत. हा नवा ट्विस्ट या प्रकरणात समोर आला आहे. वीणा कपूर या गेल्या आहेत हे समजून लोक श्रद्धांजली वाहात आहेत.

वीणा कपूर यांच्याविषयी नेमकं काय घडलं?

वीणा कपूर या जुहूमध्ये राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला हे वास्तव आहे. मात्र त्या अभिनेत्री वीणा कपूर नाही. त्यांचा फोटो या महिलेऐवजी व्हायरल केला गेला त्यामुळे वीणा कपूर यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. अॅक्ट्रेसला काम मिळणंही बंद झालं आहे.

फेक बातम्यांमुळे अॅक्ट्रेस वीणा कपूर हैराण झाल्या आहेत. वीणा कपूर दिंडोशी पोलीस ठाण्यात पोहचल्या. तिथे त्यांनी पोलिसांना आपल्याला जो काही त्रास सहन करावा लागला ते सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp