Ind Vs Pak : क्रिकेटचा सामना नकोच, सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला हरवा-विहिंप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विश्व हिंदू परिषदेनेही भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये असं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषदेनेही या सामन्याला विरोध केला आहे. 24 ऑक्टोबरला हा T20 विश्वसचषकातला हा सामना होणार आहे. या सामन्याला गिरीराज सिंग यांनीही विरोध केला आहे. एवढंच नाही तर आज असदुद्दीन ओवेसी यांनीही या बाबत प्रश्न उपस्थित करत हा सामना खेळवला जाऊ नये असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

या सगळ्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेने या सामन्याला कडाडून विरोध केला आहे. भारताने पाकिस्तानला खेळाच्या मैदानात हरवण्यापेक्षा सर्जिकल स्ट्राईक करून हरवावं अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये हिंदूंची हत्या केली जाते आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. बांग्लादेश सरकारने 2013 मध्ये हिंदूंची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी कायदा तयार केला. एवढंच नाही तर 10 दिवसात 150 मंदिरं तोडण्यात आली. 360 हून अधिक मूर्तींची तोडफोड झाली. हजारो हिंदूंची दुकानं आणि घरं लुटण्यात आली. अशी परिस्थिती बांग्लादेशात आहे. अशात आपण पाकिस्तानशी क्रिकेट सामना कसा खेळू शकतो असा प्रश्न विहिंपने विचारला आहे.

पाकिस्तानला भारताने शत्रू राष्ट्र घोषित करावं. शत्रूवर सर्जिकल स्ट्राईक करावा अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानचं अस्तित्वच देशाच्या नकाशावरून मिटवलं गेलं पाहिजे असंही विहिंपने म्हटलं आहे. काश्मीरमध्ये बदल होत आहेत ते पाकिस्तानला मान्य नाहीत. काश्मीरचा विकास झपाट्याने करा पण पाकिस्तानचं कंबरडं मोडा अशीही मागणी विहिंपने केली आहे.

हे वाचलं का?

IND Vs Pak : भारत पाकिस्तान T20 सामन्याला आमचा विरोध-रामदास आठवले

काय म्हणाले आहेत ओवेसी?

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर काही बोलत नाहीत. तसंच वाढत्या महागाईबद्दलही ते काही बोलत नाही. पाकिस्तानला घरमें घुसके मारेंगे म्हणणारे मोदी चीनबद्दल काहीही करत नाहीत. भारताचे ९ जवान मारले गेले तरीही तुम्ही त्यांच्यासोबत टी 20 सामना खेळणार आहात का? पाकिस्तान काश्मीरमध्ये लोकांच्या जिवाशी टी 20 खेळतो आहे. गुप्तचर यंत्रणा, अमित शाह काय करत आहेत? असाही प्रश्न ओवेसींनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT