Vidhan Sabha Live : ED चौकशीचा ससेमिरा लागलेले सरनाईक म्हणतात, ‘सरकारने मला क्लिनचिट द्यावी’!
गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडावर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात, सरकारने आपल्याला क्लिनचिट द्यावी अशी मागणी केली आहे. MMRDA घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गृह मंत्रालयाला अहवाल सादर करावा, घोटाळा खरंच झाला आहे की नाही हे अहवालावरुन स्पष्ट करावं अशी विनंती सरनाईक यांनी विधानसभेत केली आहे. “मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे माझ्यावर […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडावर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात, सरकारने आपल्याला क्लिनचिट द्यावी अशी मागणी केली आहे. MMRDA घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गृह मंत्रालयाला अहवाल सादर करावा, घोटाळा खरंच झाला आहे की नाही हे अहवालावरुन स्पष्ट करावं अशी विनंती सरनाईक यांनी विधानसभेत केली आहे.
“मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे माझ्यावर झालेले आरोप हे अप्रत्यक्षपणे सरकारवर झालेले आरोप आहेत. त्यामुळे या प्रकरणाची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून घ्यावी. घोटाळा झाला नाही असं समोर आलं तर अहवाल लोकांसमोर सादर करुन मला क्लिनचिट द्या किंवा मी दोषी आढळलो तर माझ्यावर कारवाई करा”, असं सरनाईक विधानसभेत म्हणाले.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई करु असं आश्वासन दिलं. काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केंद्रीय तपासयंत्रणाचा त्रास होत असल्यामुळे भाजपशी जळवून घ्या असा सल्ला दिला होता. यानंतर काल सरनाईक यांनी आणखी एक पत्र लिहून आपली खंत व्यक्त केली होती.
केंद्र आणि राज्याच्या संघर्षात मी भरडला जातोय. एखाद्या युद्धात सैनिकाच्या मागे सेनापतीसह सर्व सुभेदार असणं आवश्यक आहे. सेनापती माझ्यामागे ठामपणे आहेत पण सुभेदार कुठे आहेत असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी पक्षांतर्गत खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. आपण मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्राचा लेटर बॉम्ब म्हणून प्रत्येकाने वेगळा अर्थ काढल्याचंही सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.