सदाभाऊ खोतांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार का घेतली?; फडणवीस म्हणतात…
मुंबई: राज्यात येत्या २० तारखेला विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. भाजपप्रणित सहावे उमेदवार असलेल्या सदाभाऊ खोतांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपचे पाच उमेदवार राहिले आहेत. सदाभाऊ खोतांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतला याबाबत फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे. ”पक्षात सर्वांशी चर्चा करून सदाभाऊंचा अर्ज […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यात येत्या २० तारखेला विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहे. भाजपप्रणित सहावे उमेदवार असलेल्या सदाभाऊ खोतांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपचे पाच उमेदवार राहिले आहेत. सदाभाऊ खोतांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतला याबाबत फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे. ”पक्षात सर्वांशी चर्चा करून सदाभाऊंचा अर्ज मागे घेण्यात आला आहे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
भाजपचे पाचवे उमेदवार असलेले प्रसाद लाड यांना निवडणून आणण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. कारण भाजपला पाचव्या जागेसाठी कोट्यापेक्षा कमी मतं शिल्लक राहत आहेत. याबाबात देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही निवडणूक सोपी बिलकूल नाहीये. आम्ही सर्व गणितं आखलेली आहेत. पाचवा उमेदवार आमचाच निवडून येईल.
कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार रिंगणात?
भाजप
उमा खापरे
प्रवीण दरेकर