तलवारीसोबत बाहेर गेलेले उद्योगही परत आणा : वडेट्टीवारांचा मुनगंटीवारांना खोचक सल्ला
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असलेली जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. महाराष्ट्र सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधत आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. मुनगंटीवार यांच्या या घोषणेवर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. तलवारीसोबत उद्योगही आणा असा खोचक […]
ADVERTISEMENT

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असलेली जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. महाराष्ट्र सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधत आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. मुनगंटीवार यांच्या या घोषणेवर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. तलवारीसोबत उद्योगही आणा असा खोचक सल्ला वडेट्टीवार यांनी दिला आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “जगदंबा तलवार परत येत असेल तर आम्हालाही आनंद होईल. मात्र महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याने हजारो बेरोजगारांच्या हातचं काम गेलं. महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं. आता तलवार आणत असताना त्यासोबत उद्योगही आणा. बेरोजगाराच्या हातांना काम मिळणं हे ही तेवढचं महत्त्वाचं आहे.
उद्योग गेलेत. रोजगार बुडालेत. महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. तो विषय बाजूला ठेवून केवळ भावनेचं राजकारण करण्यासाठी जगदंबा तलवारीच्या विषय पुढे केला. तुमचं राजकारण महाराष्ट्रातील तरुणांना कळतं आहे. तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुनगंटीवार काय म्हणाले होते?
छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच महाराजांच्या विजयादशमीच्या पूजेसाठी वापरली जाणाऱ्या हिरे आणि रत्नजडीत जगदंबा तलवारीसाठी केंद्र सरकारला आम्ही विनंती केली.