मालाड मालवणी शोभायात्रा राडा प्रकरणात 20 जणांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai malvani case 20 arrested
mumbai malvani case 20 arrested
social share
google news

20 people arrested malvani case : मुंबईच्या मालाड परिसरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान दोन गटात राडा झाला होता. यामध्ये दोन गट आपापसात भिडले होते. त्यामुळे यात्रेदरम्यान तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.याप्रकरणी आता 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मालवणीमधील परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.(violence in mumbai malvani two groups clashes 20 people arrested ram navami 2023)

ADVERTISEMENT

देशभरात गुरूवारी रामनवमी (Ram Navami) उत्साहात साजरी करण्यात आली होती. मात्र काही परिसरात रामनवमी उत्सवाला गालबोट लागले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. मालाडच्या मालवणीत ही छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati Sambhajinagar) झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी ती वेळीच टाळली होती.

हे ही वाचा : राम नवमीदिवशी दुर्दैवी घटना, 35 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू; नेमकं काय झालं होतं?

मालाडमधील मालवणी भागात राम नवमी (Ram Navami) निमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. शोभायात्रा एका मशिदीसमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यात्रेदरम्यान एका तरुणाने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या (Police) निदर्शनास येताच पोलिसांनी लागलीच कृती केली आणि परिस्थिती पूर्वपदावर आणली होती. या प्रकरणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही जणांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला. पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती मालवणीत टळली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरातील हिंसा राजकीय की धार्मिक? काय आहे थेअरी?

आता मालवणीत (malavani) हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या 20 जणांना अटक केलीय.अटक करण्यात आलेल्या नागरीकांवर वातावरण बिघडवल्याचा आरोप केला आहे. या आरोपाखाली त्यांना अटक केलीय. तसेल मालवणीमधील परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील (chhatrapati Sambhajinagar) किराडपुरा भागातही हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेत तणाव निर्माण करणाऱ्या 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यासोबतच ओहरगावातही दोन गटात वाद होईन दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या दगडफेकीत 7 जण जखमी झाले होते. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT